Vivek-Sawant
Vivek-Sawant 
पुणे

नैसर्गीक संपत्तीचे जतन करण्यासाठी नोक-यांची संधी - विवेक सावंत 

विजय जाधव

भोर (पुणे) - पुढील पाच वर्षांत २५ टक्के नोक-या किंवा व्यावसाय हे नैसर्गिक संपत्तीचे जतन कसे करता येईल या विषयांवरील असतील आणि त्यासाठी ग्रीन कलर जॉब्स आणि न्यू कलर जॉब असे विभाग पाडले जात आहेत. असे मत महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे (एमकेसीएल चे) संस्थापक व माजी कार्यकारी संचालक विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

येथील अनंतराव थोपटे महाविद्यालयाच्या वतीने ग्रामीण भागातील उच्च शिक्षणावर कोविड १९ (कोरोना) आजाराचा होणारा परिणाम ('An Impact of Cocid-19 on Higher Education in Rural Areas') या विषयावर आयोजित केलेल्या वेबीनारमध्ये ते बोलत होते. मंगळवारी (ता. ४) सकाळी साडेदहा ते दीड या वेळेत युट्यूब लाईव्ह च्या माध्यमातून हे वेबीनार घेण्यात आले. यावेळी विवेक सावंत यांच्यासमवेत गुजरात येथील सरदार वल्लभाई पटेल युनिर्व्हसीटीचे व्हाईस चांन्सलर डॉ. शिरीष कुलकर्णी आणि पुण्यातील सिंबायोसिस महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. स्वाती मुजुमदार यांनीही आपले विचार व्यक्त केले. 

श्री सावंत म्हणाले, 'शेती विषयक व्यवसाय, नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्या संदर्भातले व्यवसाय, डिजिटल फ्रीलान्सिंग, ब्लॉग तयार करणे पुस्तकांचे अस्खलित वाचन करणे व डेटा इंट्री बिलिंग उत्तम पद्धतीने इंटरनेटवर पंधरा मिनिटात शिकवणे अशा पद्धतीच्या कामांना न्यू कलर जॉब्स म्हटले जाते'.  कोरोनामुळे सध्या वेबिनार आयोजित करणे  ही संवाद साधण्याची एकमेव पद्धत राहिलेली आहे.

यात शिकवणं घडतं पण शिकणे घडतं की नाही हे समजण्याची ची काही व्यवस्था नाही. त्यामुळे व्दिस्तरीय संवाद होत नसल्याचे डॉ. शिरीष कुलकर्णी यांनी सांगितले. तर कोविडमुळे विद्यार्थ्यांना नवनवीन कौशल्ये आत्मसात करण्याची गरज निर्माण झाली असल्याचे डॉ. स्वाती मुजूमदार यांनी सांगितले. या वेबिनारमध्ये राजगड ज्ञानपीठाच्या सचीव डॉ. भाग्यश्री पाटील, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, प्रा. पल्लवी मळेकर  आदींसह राज्यभरातील १५० शिक्षणप्रेमी सहभागी झाले होते.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG Live Score : केएलनं नाणेफेक जिंकली; तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

Gargai Dam Project : गारगाई प्रकल्पाला येणार वेग; मुंबईला मिळणार ४०० दशलक्ष लिटर पाणी

SCROLL FOR NEXT