sparsh.jpg 
पुणे

महिलांनो, घरातील कामे करून उरलेल्या वेळात घरातच बसून काम करण्याची संधी मिळणार...वाचा सविस्तर

हरीश शर्मा

खडकी बाजार (पुणे) : महिलांना घरातील कामे करून उरलेल्या वेळात घरात बसून काम करून आपल्या संसारात हातभार लावण्याची संधी महिलांनी महिलांसाठी "स्पर्श' संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. ज्यामध्ये गादी शिवणे, डाळी, मसाला, रांगोळी इत्यादी वस्तू पॅकिंगचा व्यवसाय महिलांना उपलब्ध करून देणार आहे. यासाठी कोणतेही भांडवल लागणार नसून मशिनरी सुद्धा संस्था महिलांना उपलब्ध करून देणार आहे. त्यामुळे घरगुती महिलांसाठी ही आनंदाची पर्वणी ठरत आहे. 

खडकी, बोपोडी, सांगवी, दापोडी, पिंपळे गुरव या भागातील महिला व पुणे शहरातील कोणत्याही भागातील महिलांना संस्थेमार्फत काम मिळणार आहे. पॅकिंग केलेला माल ही संस्था परत घेईल यासाठी महिलांना भांडवल, कच्चा माल व मशिनरी व त्याचे प्रात्यक्षिक सुद्धा संस्थेमार्फत महिलांना देण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या उपाध्यक्ष चंदा बोरकर यांनी दिली आहे.

महिलांसाठी यामध्ये कोणतेही वेळेचे बंधन नसून दारोदारी फिरण्याची ही गरज नाही. सर्व काही महिलांना आपली नित्य घरातील कामे करून करता येईल संस्थेमार्फत पिंपळे गुरव येथील कार्यालयात महिलांची बैठक झाली. "स्मॉल स्केल इंडस्ट्रीज'चे अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्श संस्थेचे अध्यक्ष सुनील बुट्टे पाटील, उपाध्यक्ष चंदा बोरकर, परिमल कडलक, योगेश कदम, पुष्पलता वायाळ, शोभा चौधरी, नलिनी पाठक, योगिता माने, अलका व्यवहारे उपस्थित होते. 


व्यवसायाची वैशिष्ट्ये 
- कोणतेही भांडवल नाही 
- घरोघरी फिरण्याची गरज नाही 
- फावल्या वेळात करता येणारी कामे 
- शिवणकाम, पॅकिंग, खाद्यपदार्थ यावर आधारित व्यवसाय 
- शहरातील कोणत्याही भागासाठी उपलब्ध  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Defamation Case : इंस्टाग्रामवर नितीन गडकरी यांची बदनामी; आयटी सेलच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

Akola News : बिश्नोई गॅंगचा धक्कादायक खंडणी कॉल!आमदाराकडे २ कोटींची मागणी; भाजप शहराध्यक्षाला जीवघेणी धमकी

Amravati MD Drugs Seized : अमरावतीत महिन्याभरात तिसऱ्यांदा एमडी ड्रग्स जप्त ; तस्करीची पाळेमुळे खोलवर रुतलेली

Shiv Jayanti Mohol : मोहोळ तालुक्यात 40 ठिकाणी "एक गाव एक शिवजयंती" उपक्रम विविध मंडळांचा सामाजीक उपक्रमावर भर

Vasai Vasai News : वसईत सीरियल शूटिंग सेटला आग, स्टुडिओचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT