पुणे

भाजप-सेनेला शह देण्यासाठी तिसरी आघाडी? (व्हिडिओ)

सागर आव्हाड

पुणे : सत्ताधारी भाजप-शिवसेनेला शह देण्यासाठी आता तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. त्याचपार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत 16 संघटनांची एकत्र महत्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता भाजपला रोखण्यासाठी सर्वच विरोधीपक्षांकडून प्रयत्न केले जात आहेत. त्यानंतर आता माजी खासदार राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत पुढील राजकीय वाटचाल ठरणार आहे. यामध्ये आघाडीसोबत जायचं की तिसरी आघडी स्थापन करायची, यावर चर्चा होणार आहे. 

या बैठकीला बळीराजा संघटना, बामसेफ, ऑल इंडिया मुस्लिम संघटना, शेतकरी कामगार पक्ष, महाराष्ट्र राज्य रामोशी संघ अशा संघटनांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. 

बैठकीतील ठळक मुद्दे

- राजू शेट्टीच्या उपस्थितीत १७ सामजिक संघटनेची बैठक झाली.
- प्रजा लोकशाही परिषद या नावाखाली एकत्रित रित्या काम करणार.
- देशातील परस्थिती भयावह,सीबीआय,ईडी यांसारख्या संस्था सरकारच्या बोटावर चालतात.

- वंचिताना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार,येत्या २० तारखेला पुण्यात मेळावा घेणार
- जातीवादी सरकारच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रयत्न करणार.
- या परिषदेच्या माध्यमातून निवडणूक रिंगणात काही उमेदवार उतरवले जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT