Order to check syllabus in schools in Pune
Order to check syllabus in schools in Pune 
पुणे

पुण्यातील शाळांमध्ये अभ्यासक्रमांची तपासणी करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरातील सर्व प्राथमिक शाळांमधील अभ्यासक्रमाची आणि गणवेश आणि शैक्षणिक साहित्य खरेदीच्या बंधनाबाबतची चौकशी करण्याचा आदेश महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी मीनाक्षी राऊत यांनी सोमवारी (ता.9) शहरातील सर्व सहायक प्रशासकीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांना दिला आहे.

पिंपरी महापालिका शाळेच्या माध्यान्ह भोजनात सापडल्या उंदराच्या लेंड्या

यानुसार शहरातील सर्व अनुदानित, स्वयं अर्थसाहाय्यित (विना अनुदानित व कायम विना अनुदानित) शाळांची तपासणी करून, त्याबाबतचा चौकशी अहवाल महापालिकेला सादर केला जाणार आहे. शिवाय ज्या शाळांमध्ये अनधिकृत अभ्यासक्रम सुरू असतील, अशा शाळांवर बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील (आर. टी.ई.) तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे.

यासंदर्भात मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत कनोजिया यांनी पालिकेकडे तक्रार दिली होती. तरीही त्यावर पालिकेकडून काहीच कार्यवाही होत नसल्याने, यासंदर्भात पालिकेला दोन वेळा स्मरणपत्रही दिले होते. मनसेच्या दुसऱ्या स्मरणपत्राच्या आधारे राऊत यांनी हा आदेश काढला आहे.त्यामुळे मनसेच्या पाठपुराव्याला यश आले आहे.

मुंबई-पुणे 'एक्सप्रेस वे'वर कारची ट्रकला जोरदार धडक; एक ठार तर, दोन जखमी

शहरातील अनेक प्राथमिक शाळांमध्ये अनधिकृत अभ्यासक्रम शिकविला जात आहे.
राज्य शिक्षण मंडळाची परवानगी असताना सीबीएसई आणि आय. सी. एस. ई. मंडळाचे अभ्यासक्रम अनधिकृतपणे शिकविण्यात येत आहेत. त्यामुळे शालेय
विद्यार्थ्यांवर मानसिक ताण येत आहे. शिवाय शाळांचे गणवेश आणि शैक्षणिक
साहित्य खरेदी करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या एकाच दुकानातून खरेदी करण्याचे बंधन पालक आणि विद्यार्थ्यांवर घालण्यात येत असल्याचा आरोप या
तक्रारीत करण्यात आला होता.

पुणे विद्यापीठाची पदवी महागणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

SCROLL FOR NEXT