Order to Education Department for sharing balance grain to students 
पुणे

शिल्लक धान्य विद्यार्थांना वाटा; शिक्षण विभागाला आदेश

सकाळवृत्तसेवा

पुणे : 'कोरोना'मुळे विद्यार्थांना शालेय पोषण आहार मिळत नसल्याचे समोर आल्याने शाळांकडे शिल्लक असलेले धान्य विद्यार्थांमध्ये वाटप करा, असे आदेश शासनाने काढले आहेत. 

राज्यात अंगणवाडी ते इयत्ता ८वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा यासाठी शालेय पोषण आहार दिला जातो. यामध्ये तांदूळ, कडधान्य आदींचा समावेश अाहे. प्रत्येक शाळेकडे एक ते दोन महिन्यांचे धान्य साठवणूक केलेले असते. 'कोरोना' मुळे राज्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच परीक्षा ही रद्द केल्याची घोषणा शिक्षण विभागाने केली आहे. शाळा, अंगणवाडी बंद झाल्याने विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळत नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने केंद्र सरकारचे मत विचारात घेऊन ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी शाळा, हंगामी वसतीगृह यातील विद्यार्थ्यांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक योजनेचे काम पहाणारे शिक्षण व शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेत किती धान्य शिल्लक आहे याचा आढावा घ्यावा, त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना समान धान्य वाटप करावे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने परीक्षांबाबत घेतला मोठा निर्णय!
वाटप करताना शाळेत गर्दी होणार नाही यासाठी प्रत्येक विद्यार्थी व पालकांना वेळा ठरवून द्याव्यात, शाळेत पालकांमध्ये एक मीटरचे सामाजिक अंतर असले पाहिजे. पालक किंवा विद्यार्थी आजारी असल्यास त्यांना घरपोच धान्य देण्याची सोय करावी.  शाळेत धान्य वाटप करण्यापूर्वी त्याची माहिती जिल्हाधिकारी व स्थानिक पोलिसांना देणे बंधनकारक आहे, असे उप सचिव राजेंद्र पवार यांनी काढलेल्या आदेशात नमुद केले आहे. 
Corona Virus :लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांनी अनुभवली पुणेकरांच्या मायेची ऊब

विद्यार्थांना जास्त धान्य मिळणे गरजेचे
'कोरोना'मुळे शिल्लक धान्य वाटप करण्याचे आदेश शाळांना दिले आहेत. मात्र पुढील दोन तीन महिने ग्रामीण भागातील विद्यार्थांना पोषण आहार मिळणे आवश्यक आहे. यासाठी ओडिसा सरकारच्या धर्तीवर पुढील तीन महिन्याचे धान्य विद्यार्थांना देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेणे आवश्यक आहे

Corona Virus : लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कर्नाटक राज्यातील 450 कामगारांना दिलासा

"ग्रामीण भागातील शाळांमध्ये १५ एप्रिल पर्यंतचा अन्नधान्यांचा साठा असेल. शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी गर्दी होऊ न देता यासंदर्भात यंत्रणा लावून धान्य वितरीत करणार आहेत."
-दत्तात्रेय जगताप, संचालक, प्राथमिक शिक्षण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Strike: 11 सप्टेंबरला सार्वजनिक सुट्टी नाही तरी बँका बंद! सलग 4 दिवस बँका बंद राहणार? पाहा काय सुरू राहणार

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

US Open 2026: पहाटे ३.३३ वाजेपर्यंत रंगला थरार; ४ तास २८ मिनिटांच्या लढतीनंतर शेल्टनने गतविजेत्या अल्काराझला दिला धक्का

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT