Pune-Police 
पुणे

'रेड झोन'मुळे शहरातील परिस्थिती कशी राहणार? पुणे पोलिस आज काढणार आदेश!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना विषाणुचा प्रादुर्भावाबाबत पुणे शहर हे 'रेड झोन'मध्ये येते. त्यामुळे येथील निर्णयाविषयी राज्य सरकारचा आलेल्या आदेशाबाबत रविवारी (ता.3) स्पष्टता करण्यात येईल, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी शनिवारी सांगितले.

केंद्र सरकारच्या आदेशानंतर शनिवारी पुणे व पिंपरी चिंचवड या शहरातील काही कंपन्यानी आपल्या कामगारांना कामावर हजर राहण्याविषयी कळविले होते, मात्र दुसरीकडे शहरात जाण्यासाठी पोलिसांची अधिकृत परवानगीची आवश्यकता असल्यामुळे ही परवानगी घ्यायची कशी आणि कामवर हजर राहायचे कसे, याबाबत गोंधळ निर्माण झाला होता. 

याविषयी डॉ. शिसवे म्हणाले, 'पुणे, पिंपरी चिंचवड व मुंबई ही शहरे रेड झोनमध्ये येतात. त्यामुळे पुण्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेणे गरजेचे आहे. राज्य सरकारने शनिवारी नवीन आदेश दिले आहेत. या आदेशात नेमके काय नमुद केले आहे, याविषयी आम्ही रविवारी आदेश काढत स्पष्टता करु.'

पुण्यातील काही भागांत कोरोनाचे रुग्ण नसले तरी, संपूर्ण शहर 'रेड झोन' राहणार आहे. येत्या 17 मेपर्यंत लॉकडाऊनची काटेकारेपणे अंमलबजावणी असेल, याकडेही प्रशासनाने लक्ष वेधले आहे. दरम्यान, पुणे शहर हे 'रेड झोन' असावे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आग्रही राहिले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या पाहता क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दींचे झोन केले आहेत. त्यात सर्वाधिक रुग्ण असलेला भाग 'रेड', त्यापेक्षा कमी रुग्णांचा परिसर हा 'ऑरेन्ज' आणि त्यानंतर 'ग्रीन' झोन; अशा टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांत ठराविक भागांतील म्हणजे, भवानी पेठ, शिवाजीनगर, कसबा पेठ, ढोले-पाटील रस्ता परिसरातील रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheetal Tejwani Arrest : शीतल तेजवानीची रवानगी येरवडा कारागृहात; ३०० कोटींच्या व्यवहाराबाबत मौन!

Solapur News : शेतकऱ्यांच्या तक्रारीला यश; आमदार खरे यांच्या हस्तक्षेपाने लांबोटी विद्युत केंद्रातील अभियंता निलंबित!

Modi Government Schemes 2025 : मोदी सरकारच्या ‘या’ योजनांनी गाजवलं 2025 वर्ष; तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच फायदा!

Video: जय शाहांकडून Lionel Messi ला टीम इंडियाची जर्सी भेट, T20 World Cup साठीही आमंत्रण; फुटबॉलचा बादशाह दिल्लीत काय म्हणाला?

Latest Marathi News Live Update : महावितरणने एका झटक्यात फेडले १२,८०० कोटींचे कर्ज

SCROLL FOR NEXT