Ruby Hall Clinic sakal
पुणे

अवयव प्रत्यारोपण परवाना निलंबित करण्याला तुर्तास स्थितीत

रूबी हॉल क्लिनिकला दिलासा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मानवी प्रत्यारोपण कायद्याच्या कलमांचे उल्लंघन केल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आल्याने कारवार्इ करण्यात आलेल्या रूबी हॉल क्लिनिकला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. अवयव प्रत्यारोपणाचा परवाना निलंबित करण्याच्या आदेशाला शुक्रवारपर्यंत (ता. २२) उच्च न्यायालयाने तुर्तास स्थगिती दिली आहे. न्यायाधीश माधव जमादार आणि रेवती माहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने बुधवारी (ता. २०) हा आदेश दिला.

अवयवदाता आणि अवयव घेणारा यांच्या कागदपत्रांचे काळजीपूर्वक परीक्षण न केल्याचा ठपका ठेवून रूबी हॉल क्लिनिकच्या अवयव प्रत्यारोपण केंद्राची नोंदणी पुढील सहा महिने किंवा आरोग्य विभागाच्या समितीचा अंतिम अहवाल येईपर्यंत निलंबित करण्याचा आदेश गेल्या आठवड्यात सार्वजनिक आरोग्य खात्याने काढला आहे. परवाना निलंबित केल्याविरोधात रूबी हॉल क्लिनिकने उच्च न्यायालयात याचिका दाखल केले आहे. त्यावर बुधवारी सुनावणी झाली. याबाबत सरकारी वकील शुक्रवारी (ता. २२) आपले म्हणणे सादर करणार आहे. त्यानंतर पुढील सुनावणी होर्इल, अशी माहिती रूबी हॉल क्लिनिकतर्फे ॲड मंजूषा कुलकर्णी यांनी दिली.

या प्रकरणात आमची काहीही चूक नसून अवयव प्रत्यारोपणासाठी आलेल्या रुग्णांची व दात्यांच्या कागदपत्रांची तपासणी करणारी यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. आमच्या रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी दाखल असलेल्या रुग्णांना जवळच्या रुग्णालयात हलविण्याचे आरोग्य खात्याने काढलेल्या आदेशात नमूद आहे. मात्र ज्या डॉक्टरांनी आधीपासून उपचार केले आहे त्यांनीच आॅपरेशन करावे, असा रुग्णांचा आग्रह असतो. मात्र निलंबनाच्या आदेशामुळे अशा रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे परवाना निलंबित करण्याच्या आदेशाला स्थगिती मिळावी, असा युक्तिवाद रुग्णालयाचे वकील अर्जुन कदम यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

Glenn Maxwell ने बनवली भारत, ऑस्ट्रेलिया अन् इंग्लंडची मिळून ODI XI; पण एकाही इंग्लिश खेळाडूला स्थान नाही, 'या' भारतीयांची निवड

Maharashtra Floods : पाचच जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल अंतिम, दिवाळीपूर्वी मदतीवर सावट; ४८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

जनसंपर्क, भ्रमंती आणि संस्कृतीचे दर्शन

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 15 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT