Organized joint workshop for Sarpanch Gram Sevak and Contractors Pune Zilla Parishad sakal
पुणे

Pune News : सरपंच, ग्रामसेवक, ठेकेदारांची २७ जानेवारीला संयुक्त कार्यशाळा

जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदारांसाठी संयुक्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २७ जानेवारीला पुणे जिल्हा परिषदेत ही संयुक्त कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जलजीवन मिशनअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांना अधिक गती देण्यासाठी ही संयुक्त कार्यशाळा ठेवण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील गावा-गावातील आणि वाड्या-वस्त्यांवरील सर्व कुटुंबांना नळाद्वारे पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत नळजोडणी करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत जास्तीत जास्त नळजोडणी करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र यासाठी गावपातळीवर कामांना अडथळे येत आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी या उपक्रमाच्या अंमलबजावणीशी निगडित सर्व घटकांना एकत्रित आणून, त्यांना याबाबत मार्गदर्शन करता यावे, हा या संयुक्त कार्यशाळेच्या आयोजनामागचा जिल्हा परिषद प्रशासनाचा मुख्य उद्देश असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

या गावपातळीवरील अडचणींमुळे पाणी योजना पूर्ण झाल्यानंतरसुद्धा हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेला अडथळा येऊ शकतो. हा अडथळा आताच दूर करण्यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. या कार्यशाळेत गावपातळीवर सरपंच आणि ग्रामसेवकांना योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत. हे जाणून घेण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT