Akhil-Maharashtra
Akhil-Maharashtra 
पुणे

भटकंतीचे वेध लागलेल्यांसाठी उद्यापासून वेबिनारचे आयोजन

सकाळवृत्तसेवा

पुणे - लॉकडाउन संपताच पावसाळ्यात ट्रेकिंग आणि एकूणच भटकंती करण्याचे वेध लागलेल्यांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा पाच दिवसांचा वेबिनार अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाने २६ ते ३० जून दरम्यान आयोजित केला आहे. यात गिर्यारोहण या साहसी क्रीडाप्रकाराच्या शिखर संघटनांच्या प्रमुखांसह काही अनुभवी तज्ञ सहभागी होत आहेत. त्यांची आधी छायाचित्रीत झालेली भाषणे यात ऐकविण्यात येतील.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

https://www.facebook.com/groups/mahasangh/ या फेसबुक पेजवरून वेबिनारमध्ये रोज सायंकाळी सात वाजल्यापासून सहभागी होता येईल. दररोज दोन वक्‍त्यांची भाषणे आधी प्रसारित केली जातील. ट्रेकिंग करण्याची परवानगी आहे का, असल्यास काय काळजी घ्यायची, वर्तन कसे ठेवायचे आदींबाबत यात ऊहापोह होईल.

भारतीय गिर्यारोहण महासंघाचे अध्याक्ष ब्रिगेडीयर अशोक ॲबे, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, हिमालयन गिर्यारोहण संस्थेचे उपप्राचार्य विंग कमांडकर देविदत्त पांडा, हिमालयन क्‍लबचे माजी अध्यक्ष हरिश कपाडिया, ब्रिटनस्थित अल्पाईन क्‍लबचे माजी अध्यक्ष जॉन पोर्टर, ज्येष्ट गिर्यारोहक प्रा. प्र. के. घाणेकर, गिरिप्रेमीच्या संस्थापिका उषःप्रभा पागे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुर डॉ. नितीन करमळकर, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अभय ओक आणि अष्टहजारी नागरी गिर्यारोहण मोहिमांचा लीडर उमेश झिरपे हे तज्ञ यात मार्गदर्शन करतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Pune Visit : सुरेश कलमाडींनी पुण्यात पंतप्रधानांना चप्पल फेकून मारली अन्...

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

SCROLL FOR NEXT