Otur protesting central government hike in onion export duty by 40 percent agriculture farmer Sakal
पुणे

Onion : ओतूर येथे केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्क्याने वाढवल्याचा निषेध करत केली पत्रकाची होळी

शेतकरी संघटने कडून केंद्र सरकारचा निषेध

पराग जगताप

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथील कृषीउत्पन्न बाजार समितीच्या उपबाजारात केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्क्याने वाढवल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली असून त्यामुळे शेतकरी संघटना व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी येथील बाजार समितीत केंद्र सरकारचा निषेध करून पत्रकांची होळी करण्यात आली.

मागील आठवड्यात जो कांदा २५ ते ३० रूपये किलो ने घाऊक बाजारात विक्री होत होता तोच कांदा केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे १२ ते १६ रूपये किलो पर्यत घसरले आहे. त्यामुळे शेतकरी संघटने कडून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शिवनेरी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र ढोमसे,महाराष्ट्र राज्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्या अध्यक्ष प्रमोद पानसरे,

कृषीउत्पन्न बाजार समिती संचालक तुषार थोरात,प्रभाकर शिंदे,संतोष होनराव,संजय शिंदे,तान्हाजी डुंबरे,विष्ण शेरकर, राणूजी शिंदे,धनंजय शिरसाठ,ऋषीकेश तांबे,नवनाथ घोलप,राजेंद्र शिंदे,अरूण ढमाले,प्रमोद शिंदे,सुनिल मंडलिक,किशोर साबळे,राजेंद्र ढमाले,अमोल नलावडे,अमोल उकिर्डे,मंगेश नायकोडी,अशोक नलावडे,शोभाचंद बोर्हाडे,संपत नायकोडी,रामदास ढमाले हे व इतर शेतकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकरी संघटने कडून केंद्र सरकार कडून कांद्याचे वाढत चाललेले बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रथम नाफेडचा कांदा बाजारात विक्रीसाठी आणण्याची घोषणा केले गेली व नंतर आता कांदा निर्यातीवर ४० टक्के निर्यात शुल्क वाढवून सरकारने कांदाचे दर घसरवण्याचे काम केले आहे.याबाबत शेतकरी संघटने कडून केंद्र सरकारचा तीव्र निषेध करण्यात येत असून केंद्र सरकार कडून त्वरीत ४० टक्के निर्यात वाढवण्याचा निर्णय माघे घेण्यात यावा ,

अन्यथा जुन्नर तालुक्यातील सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन केंद्र सरकार विरूध्द तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवनेरी शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजेंद्र ढोमसे,महाराष्ट्र राज्या कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे पुणे जिल्ह्या अध्यक्ष प्रमोद पानसरे यांनी दिला.तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषीउत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी संघटनेच्या भूमिकेला व आंदोलनाला पाठिबा देणार असल्याचे यावेळी कृषीउत्पन्न बाजार समिती संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तुषार थोरात यांनी जाहिर केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OYO Hotels: ओयो हॉटेलमध्ये एक तासात नेमकं काय होतं? सरकार अभ्यास करणार? सुधीर मुनगंटीवरांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला

Latest Maharashtra News Updates : मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड चौफुलीवर असलेल्या अतिक्रमण काढले

ENG vs IND: इंग्लंडच्या रस्त्यावर आकाश दीपचा दरारा! इंग्रज गात आहेत नवा नारा; Video व्हायरल

Stock Market Closing: सेन्सेक्स 9 अंकांच्या वाढीसह बंद; FMCG आणि रिअल्टी शेअर्स वधारले, 'हे' शेअर्स बनले टॉप गेनर्स

Xi Jinping: जिनपिंग यांच्या अधिकारात बदल शक्य; विकेंद्रीकरणाचे माध्यमांत वृत्त; नेतृत्वाच्या बदलाचीही रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT