Malin Village Sakal
पुणे

आमचे पूर्वीचे माळीण गाव आतापेक्षा चांगले होते; माळीणकरांच्या भावना

आंबेगाव तालुक्यात ३० जुलै २०१४ रोजी रात्रभर पडलेल्या सततच्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला.

सकाळ वृत्तसेवा

फुलवडे - ‘पूर्वीचे माळीण (Malin) डोळ्यांसमोरून हटत नाही. सर्व माणसेजवळ आहेत, असाच भास होतो. राहिलेल्या लोकांना नवीन आरसीसी बांधकामातील घरे (Home) बांधून दिली. सर्व सुख सोयी मिळाल्या पण आमची पूर्वीची घरे, गाव यापेक्षाही चांगले होते. त्यामुळे गावपण होते. आपलेपणाची जाणीव होती. नवीन गावात या सर्व गोष्टी हरवल्या आहेत. पुनर्वसनाशिवाय (Rehabilitation) पर्याय नव्हता. पण इतक्या वर्षांनीही आमचे मन अजूनही त्या गावातच आहे,’ अशा भावना येथील माळीणच्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. यावेळी बऱ्याच नागरिकांना अश्रू अनावर झाले. (Our Former Malin Village was Better than it is Now)

आंबेगाव तालुक्यात ३० जुलै २०१४ रोजी रात्रभर पडलेल्या सततच्या पावसामुळे साचलेले पाणी डोंगराला पडलेल्या भेगांमध्ये साठून डोंगराचा कडा सकाळी साडेसातच्या सुमारास कोसळला. काही कळण्याच्या आतच मुरुम, मोठे दगड व मातीच्या ढिगाऱ्याखाली तेथील ४४ घरे गाडली गेली. शासकीय यंत्रणेने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या माध्यमातून आठ दिवस ढिगाऱ्याचे खोदकाम करून १५१ मृतदेह बाहेर काढले. शासनाकडून मृतांच्या वारसांना प्रत्येक व्यक्तिमागे ८.५० लक्ष रुपये देण्यात आले व विविध योजनेतून मदत केली. दुर्घटनेनंतर अडीच वर्षांत ६८ घरांमध्ये कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसनातील घरे आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे भूकंपरोधक व कमी खर्चात उपयोगी बांधण्यात आली. शाळा, ग्रामपंचायत, दवाखाना, समाजमंदिर या इमारती बांधण्यात आल्या असून संरक्षण भिंत देखील बांधण्यात आली आहे.

‘पायरडोह’ मुळे पाण्याची वणवण थांबणार

गावात सर्व सुख सोयी झाल्या मात्र नवीन माळीणचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. उन्हाळ्यात येथील नागरिकांना दूरवरून पाणी आणावे लागते. माळीणला कायमस्वरूपी पाणी मिळावे यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ‘पायरडोह’ याठिकाणी तलाव बांधला आहे. या डोहातून माळीणला पाणी देण्याचे नियोजन केले असून, यासाठी बुब्रा नदीवर बंधारे बांधले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत माळीणकरांची पाण्यासाठी वणवण थांबणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shalinitai Patil Passes Away: शालिनीताई पाटील यांचं मुंबईत राहत्या घरी निधन

IND vs SA. 5th T20I: भारताने जिंकली मालिका! आधी हार्दिक-तिलकने चोपलं अन् मग चक्रवर्तीने फिरकीच्या जाळ्यात द. आफ्रिकेला अडकवलं

T20 World Cup साठी संघ निवडीच्या एक दिवस आधीच शुभमन गिल टीम इंडियातून बाहेर; BCCI ने दिले अपडेट्स

Car Loan: नवीन कार घेणार असाल तर खुशखबर! 'या' बँका देत आहेत कार कर्जावर सर्वात कमी व्याजदर, एकदा यादी पाहाच!

बनावट दारु विक्री! देशी-विदेशी दारू, हातभट्टी अन्‌ विविध विदेशी ब्रॅंडची बनावट टोपणे जप्त; सोलापूरच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांची कारवाई

SCROLL FOR NEXT