pune sakal
पुणे

पुणे : खड्यांची जबाबदारी आमची, १५ दिवसांत रस्ते दुरुस्त करू

स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने

अक्षय साबळे

पुणे : मुसळधार पाऊस पडल्यानंतर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली असून, विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांना खड्डे पडल्याने चालकांची तारांबळ होत असल्याने पालिकेच्या (corporation) कारभारावर टीका होत असताना स्थायी समिती (standing committee) अध्यक्ष हेमंत रासने (hemant rasane) यांनी खड्ड्यांची जबाबदारी ही आमची व प्रशासनाची आहे, पुढील १५ दिवसात शहरातील सर्व रस्ते दुरुस्त केले जातील असे स्पष्ट केले आहे. दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी हे रस्ते दुरुस्त केलेले असताना त्यावर खड्डे पडल्याने कामाच्या दर्जावर प्रश्‍न उपस्थित झाला आहे. (Our responsibility repair roads in 15 days say hemant rasane)

कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर शहरात लॉकडाऊन लावण्यात आला होता. या काळात महापालिकेने सांडपाणी वाहिनी व जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेतले होते. मे महिना संपला तरी हे काम सुरूच होते. याच काळास लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्याने शहरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. वर टीका होत असल्याने मध्यवर्ती भागातील रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तसेच कामात समन्वय ठेवण्यासाठी चार अधिकारी देखील नियुक्त केले होते. पण तरीही रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याने रस्ते खचले असल्याचे ‘सकाळ’ने मांडले होते.

गेल्या आठवड्यात शहरात मुसळधार पाऊस झाल्यानंतर उपनगरांमधील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेतच पण बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता यासह पेठांमधील अंतर्गत रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे आरोप मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी भाजपच्याच एका नगरसेवकाने उपस्थित केला. त्यानंतर विरोधक नगरसेवकांनी देखील हा मुद्दा उचलून धरला. त्यावेळी प्रशासनाकडून लवकर रस्ते दुरुस्ती करू असे आश्‍वासन दिले.

याबाबत पत्रकार परिषदेत हेमंत रासने यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘गेल्या ५० वर्षात सांडपाणी वाहिनी बदलली नव्हती, ते काम एप्रिल-मे मध्ये झाले आहे. शहराच्या इतर भागातही जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे जे खड्डे पडले आहेत, त्याची जबाबदारी आमची व प्रशासनाची आहे. हे रस्ते पुढील १५ दिवसात चांगले करावेत असे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

सिमेंटच्या कामालाही खड्डे

खड्डे बुजविल्यानंतर तेथे डांबर टाकल्यास रस्ते खचून खड्डे पडतात, त्यामुळे हे खड्डे बुजविण्यासाठी सिमेंट काँक्रिट टाकले जात असल्याचे प्रशासनाने सांगितले होते. मात्र, सिमेंटचे काम देखील व्यवस्थित केले नसल्याने सिमेंट निघून खड्डे पडल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. दरम्यान, पावसाळ्यात खड्डे बुजविले जातील, पण पावसाने पूर्ण उघडीत दिल्यानंतरच सर्व रस्ते दुरुस्त होतील, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UP Dog Life Imprisonment : ऐकावं ते नवलच! आता उत्तर प्रदेशात कुत्र्यालाही होणार जन्मठेप; योगी सरकारचा नवा निर्णय

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

Thane Traffic: घोडबंदर मार्गावर दिवसा 'या' वाहनांना नो एन्ट्री, एकनाथ शिंदे यांचे निर्देश जारी

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

SCROLL FOR NEXT