सोयाबीन sakal
पुणे

सोयाबीनवर 'मोझॅक' व्हायरसचा प्रादुर्भाव

या रोगाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका आहे.

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : सोयबीन पीक काही भागात फुलोऱ्यात; तर काही भागात शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, या पिकावर पिवळा मोझॅक व्हायरस (Soybean Yellow Mosaic Virus-SMV) दिसून येत आहे. या रोगाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास उत्पादनात मोठी घट होण्याचा धोका आहे.

प्रमुख लक्षणे

हा विषाणूजन्य रोग असून, हा पॉटी व्हायरस या विषाणूमुळे होतो. या रोगामुळे झाडांची पाने आकाराने लहान होतात. रोगट झाडांच्या पानांचा काही भाग हिरवट; तर काही भाग पिवळसर दिसून येतो. पानांच्या शिराजवळ पिवळे डाग दिसतात. बाधित झाडांची वाढ पूर्णपणे खुंटते, तसेच पाने सुरकतून व ओबडधोबड होतात व शेंगाची संख्या देखील कमी होते. या रोगामुळे सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता घटलेली दिसून आली आहे. उत्पादनामध्ये साधारणपणे ८ ते ३५ टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते व काही भागात उत्पादनामध्ये ९४ टक्क्यांपर्यंत घट नोंदवलेली आहे.

प्रसार

या रोगाचा प्रसार प्राथमिक बियांण्यामार्फत होतो. तसेच, दुय्यम प्रसार हा रस शोषणाऱ्‍या किडीमार्फत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी व मावा या किडींचा समावेश आहे.

व्यवस्थापन

  • या रोगांचा प्रसार रस शोषणाऱ्या किडीमुळे होत असल्यामुळे नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशकांची फवारणी करणे गरजेचे आहे.

  • पेरणीपूर्वी बियाण्यास आंतरप्रवाही कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करावी.

  • शेतामधील रोगग्रस्त झाडे उपटून जाळून नष्ट करावीत.

  • रोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी आंतरपीक व मिश्र पीक पद्धतीचा अवलंब करावा.

  • रस शोषणाऱ्या किडीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतामध्ये एकरी किमान पंचवीस निळे व पिवळे सापळे उगवणीनंतर १०-१५ दिवसांनी पिकाच्या समकक्ष उंचीवर लावावेत.

  • पीक उगवणीनंतर २०-२५ दिवसांनी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

  • रस शोषणाऱ्‍या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडोक्लोप्रिड १७.८ एस.एल २.५ मिली किंवा प्लोनीकामिड ५० डब्ल्यूजी ३ ग्रॅम किंवा थायमेथॉक्झाम २५ डब्ल्यूजी ३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

येथे साधा संपर्क

या रोगाची प्रमुख लक्षणे, प्रसार व व्यवस्थापन याबाबत अधिक माहितीसाठी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयतज्ज्ञ डॉ. दत्तात्रेय गावडे यांच्याशी (मोबाईल ९४२१२७०५१०) संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना ‘या’ दिवशी मिळणार प्रत्येकी ३००० रुपये; निधी मागणीची फाईल वित्त विभागाकडे; बालसंगोपन योजनेसाठीही मिळणार १०० कोटी

पोलिस ठाण्यात जाऊनही न्याय मिळत नाही, चिंता नको, आता प्रत्येक शनिवारी भेटणार ‘एसपी’! सोलापूर पोलिसांचे ‘न्याय संवाद’ ॲप, ‘या’ क्रमांकावर करा तक्रार

HSC Hall Ticket 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी अपडेट! आजपासून बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध; असे करा डाउनलोड

प्रचार उद्या थांबणार! मंगळवारी रात्रीपासून उमेदवारांच्या हालचालींवर राहणार नजर; रात्री १० नंतर सोलापूर शहरातील पक्ष कार्यालये, दुकाने राहणार बंद, वाचा...

e-SIM Fraud Awareness : ई-सिम कार्डच्या नावावर फसवणूक

SCROLL FOR NEXT