पुणे

भीमाकोरेगाव : विजयस्तंभ अभिवादनासाठी बाहेरच्यांना परवानगी नाही!

सकाळवृत्तसेवा

केसनंद - कोवीडच्या पार्श्वभुमीवर पेरणे विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाला बाहेरील व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. कोरोनामुळे अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी येत्या ३० डिसेंबर २०२० रात्री १२ वाजलेपासून ते २ जानेवारी २०२१ ला सकाळी ६ वाजेपर्यंत पेरणे व परिसरातील गावात कार्यक्रम व गर्दी करण्यास तसेच बाहेरील व्यक्तींना परवानगी शिवाय प्रवेश करण्यास प्रशासनाकडून निर्बध घालण्यात आले आहेत. या काळात केवळ पोलीसांकडून दिलेल्या पास धारकांनाच प्रवेश दिला जाणार आहे.

प्रामुख्याने लोणीकंद पोलिस ठाणे हद्दीतील लोणीकंद, पेरणे, तुळापुर, बकोरी, वढु खुर्द, केसनंद, कोलवडी, डोंगरगाव, फुलगाव तसेच शिक्रापुर पोलीस ठाणे हद्दीतील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढु बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या गावांमध्ये बाहेर गावातील व्यक्तींना या गावांमध्ये येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम प्रतिकात्मक स्वरुपात होणार असल्याने पेरणे विजयस्तंभ व परिसरात सभा,मंडप, खाद्य पदार्थ स्टॉल, पुस्तक स्टॉल, खेळणी विक्रीचे स्टॉलवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. पोलिसांच्या परवानगी शिवाय या परिसरात व्यक्ती व वाहनांनाही प्रवेश नसेल. 

प्रतिबंधित गावांमध्ये लोकांनी एकत्र येणे, सभा घेणे तसेच शस्त्र, लाठी, काठी बाळगणे तसेच बॅनर, फ्लेक्स, होर्डींगवरही प्रतिबंध असणार आहे. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासासाठी रॅली, पदयात्रा, वादग्रस्त फलक व घोषणांवरही निर्बंध घालण्यात आले असून समाज माध्यमात चुकीची माहीती, अफवा पसरविण्यावरही कडक निर्बंध असणार आहेत. तसेच बाहेर गावावरुन आलेल्या व्यक्तीना हॉटेल, लॉजेस इतर आस्थापनात वास्तव्यासही प्रतिबंध असेल.

प्रतिबंधात्मक आदेशातून अत्यावश्यक वैदयकीय, अग्नीशमन, पोलीस व अत्यावश्यक सेवेतील शासकीय अधिकारी, कर्मचारी, माध्यमांचे प्रतिनिधी व पोलीसांनी दिलेले पासधारकांनाही सवलत असेल.

मानवंदनेसाठी येणारे पासधारक, शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांची कोवीड तपासणी व मार्गदर्शक सूचनांचे पालन तसेच मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच आदेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

तसेच कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येणे, थांबणे चर्चा करणे व कार्यक्रमाचे आयोजन करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ग्रामीण भागातही रात्रीच्या जमावबंदीचे आदेश...
नववर्षाच्या निमित्ताने ग्रामीण भागातही गर्दीची शक्यता असल्याने मावळ, मुळशी, हवेली तालुकयासह शिरुरमधील कोरेगाव भीमा, डिंग्रजवाडी, सणसवाडी, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, वाजेवाडी, आपटी, वाडेगाव या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्येही दि. 25 डिसेंबर ते दि.5 जानेवारी 2021 दरम्यान रात्री 11.00 ते सकाळी 06.00 पर्यंत जमावबंदीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेतील परवानगीधारक व्यक्तीना यातून सुट असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अहिल्यानगर हादरलं! 'वैद्यकीय पदवी नसताना चालवला दवाखाना'; तीन बोगस डॉक्टरांवर गुन्हा, अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया

Pune News: शीव, पाणंद, रस्त्यांची गावदप्तरी नोंद होणार; जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे समितीची राज्य सरकारला शिफारस

'मी जेवणात उंदीर खाल्लाय' 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेतील अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग, म्हणाली, 'हे ऐकून माझ्या....'

Ahilyanagar Crime:'सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेने जीवन संपवले'; अकोले तालुक्यात उडली खळबळ

Latest Marathi News Live Updates : रायगडमध्ये तूफान पाऊस, रेड अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT