Oxygen Sakal
पुणे

ऑक्सिजन... नो टेन्शन

तिसऱ्या लाटेची प्रशासनाकडून तयारी; उद्योगांकडूनही घेणार मदत

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत कोणत्या औषधाची मागणी वाढेल, हे नेमकेपणाने सांगता येत नाही. पण दोन्ही लाटांचे अनुभव पाहता ऑक्सिजन मात्र नक्कीच लागणार आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेसाठी एक हजार ८० मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज रुग्णांना भासण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनच्या उपलब्धतेसाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

पुणेकरांनी कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट अनुभवली आहे. या दोन्ही लाटेत ऑक्सिजन बेडसाठी रुग्ण फिरत असल्याचे विदारक चित्र दिसले. यातून धडा घेत प्रशासनाने संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी आरोग्याची पायाभूत व्यवस्था सक्षम करण्यावर भर दिला आहे. त्यात ऑक्सिजन पुरवठ्याला सर्वाधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे.

ऑक्सिजन मागणी

जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत एका दिवसातील ऑक्सिजनची सर्वाधिक मागणी ३६० मेट्रिक टनाची होती. त्या वेळी एक लाखांहून अधिक रुग्णांना कोरोनाच्या उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनवर ठेवले होते. ऑक्सिजनची ही मागणी लक्षात घेऊन प्रशासन ऑक्सिजन उत्पादन आणि साठवण्याची क्षमता वाढवत आहे.

पुढील तीन दिवसांचा ऑक्सिजन साठा शिल्लक राहील, या दृष्टीने नियोजन सुरू आहे. त्यासाठी उद्योगांचीही मदत घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यातील स्थिती-

१०८० मेट्रिक टन

ऑक्सिजन आवश्यकता-

९५६ मेट्रिक टन

उपलब्धता -

१२४ मेट्रिक टन

कमतरता -

अशी पूर्ण करणार कमतरता : २४४ ड्युरा सिलिंडर आणि प्रस्तावित ‘लिक्विड मेडिकल ऑक्सिजन प्लांट’ उभारण्यात येत आहेत.

क्रायोजेनिक टँक ऑक्सिजन साठवणूक क्षमता :

५९५ किलो

जिल्ह्यात कार्यान्वित ऑक्सिजन प्लांट व कंसात क्षमता

पुणे शहर ः डॉ. नायडू रुग्णालय, दळवी रुग्णालय, शिवाजीनगर, बाणेर, लायगुडे हॉस्पिटल, इएसआय बिबवेवाडी (१२ हजार १०० लिटर प्रतिमिनीट).

पिंपरी-चिंचवड ः नवीन थेरगाव हॉस्पिटल, वायसीएम हॉस्पिटल, नवीन आकुर्डी हॉस्पिटल (२४६० लिटर प्रतिमिनीट).

पुणे ग्रामीण ः जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ, चांडोली, महिला रुग्णालय बारामती, उपजिल्हा रुग्णालय मंचर, जिल्हा परिषद कोविड रुग्णालय हिंजवडी, उपजिल्हा रुग्णालय इंदापूर, प्राथमिक आरोग्य केंद्र शिरोली, नर्सिंग स्कूल कोविड रुग्णालय बारामती, नारायणगाव जुन्नर, काळे कॉलनी मावळ, ग्रामीण रुग्णालय रुई, बावडा, अवसरी, घोडेगाव (४०८४ लिटर प्रतिमिनीट).

प्रस्तावित ऑक्सिजन प्लांट

बारामती वैद्यकीय महाविद्यालय, पुणे कॅन्टोन्मेंट, जम्बो कोविड सेंटर अवसरी, ग्रामीण रुग्णालय रुई, बावडा, सुपा, घोडेगाव (४६९५ लिटर प्रतिमिनीट).

सीएसआरमधून ग्रामीण रुग्णालय जेजुरी, सासवड, वेल्हे, पाबळ, मलठण, बारामती, न्हावरा, शिक्रापूर, पौड, यवत, चाकण, देहू कॅन्टोन्मेंट (५७९२ लिटर प्रतिसेंकद मिनीट).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT