aptale 
पुणे

(व्हिडिओ) भलरीच्या तालावर रंगली भात लावणी

मीननाथ पानसरे

आपटाळे (पुणे) : जुन्नर तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील बहुतांशी ठिकाणी पावसाअभावी भात लावणी रखडल्या होत्या. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या परिसरात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे भात लावणीच्या कामांना वेग आला आहे. आदिवासी भागातील महिला शेतकरी पारंपरिक लोकगीते म्हणत लावणीची कामे करतानाचे चित्र दिसून येत आहे.

जुन्नरच्या आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण भात शेतीवर अवलंबून आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत भाताच्या आवणीची कामे पूर्ण होतात. यंदाच्या वर्षी मात्र ऑगस्ट महिना सुरू होऊन देखील पाऊस समाधानकारक होत नसल्याने भात आवणीची कामे खोळंबली होती. घाटमाथा वगळता इतरत्र भाताच्या आवणीची कामे रखडल्याने भात उत्पादक शेतकऱ्यांपुढील अडचणीत वाढ झाली होती. 

मात्र, गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे भात शेतीच्या कामांना वेग आला आहे. निसर्ग चक्रीवादळाने आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. या नुकसानीतून बळिराजा अद्याप सावरला नसून, पावसाने हुलकावणी दिल्याने भातशेती अडचणीत सापडली असल्याची खंत राजूर येथील उत्पादक दत्तू मुंढे यांनी व्यक्त केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest: ''दलितांना, शेतकऱ्यांना भडकावल्यानंतर आता विद्यार्थ्यांना चेतवलं जातंय'', दिल्ली आंदोलनावर योगी आदित्यनाथांचं वादग्रस्त विधान

Loni Kalbhor Police: लोणी काळभोर पोलिसांची एंजल हायस्कूलमध्ये व्यसनमुक्ती, सायबर सुरक्षा व महिला संरक्षणावरील जनजागृती कार्यशाळा

Career Numerology : 'या' 3 मुलांकाचे लोक वारंवार नोकरी बदलतात; पण याच निर्णयामुळे बनतं लाखोंचं करिअर

National Cycle Competition : मणीपूरचा अथोकपम बीके सिंग पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेचा यंदाचा विजेता....

Live Updates Marathi: नागपुरात सोनम वांगचुक आणि अभिजित दीपके यांचा समर्थनात तरुणाई एकत्र

SCROLL FOR NEXT