Paid leave for workers on May 7 for voting Collector Dr Suhas divase lok sabha election Sakal
पुणे

Lok Sabha Poll 2024 : मतदानासाठी सात मे रोजी कामगारांना पगारी सुटी - जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांचे निर्देश, बारामती लोकसभा निवडणूक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात बारामती लोकसभा मतदासंघासाठी मंगळवारी (ता. ७) मतदान होत असून, मतदारसंघातील सर्व आस्थापनांनी कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुटी द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. तसेच, नागरिकांनी मतदान केंद्राची माहिती घेऊन मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला असे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात म्हाळुंगे, सूस, बावधन बुद्रूक, ताथवडे, हिंजवडी, पिरंगुट, मान, भुकूम, भूगाव,

लवळे, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात कात्रज, धायरी, नऱ्हे, वडगाव बुद्रूक, वारजे, शिवणे खडकवासला, खेड शिवापूर, बिबवेवाडी (काही भाग) या शहरी भागाचा समावेश आहे. या भागातील मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

बारामती मतदारसंघातील ग्रामीण भागासह शहराशी संलग्न भागात उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत सर्व आस्थापना, कारखाने, खासगी कंपन्या, दुकाने, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे, मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुटी देवून मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन डॉ. दिवसे यांनी केले आहे.

माहितीसाठी सहायता कक्षाशी संपर्क साधा-

मतदान केंद्राच्या माहितीसाठी मतदान केंद्र किंवा मतदान सहायता कक्षाशी संपर्क साधावा. निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci.gov.in/pollingstation या लिंकवर क्लिक करून आपल्या मतदान केंद्राविषयी माहिती घेता येणार आहे. वोटर हेल्पलाइन ॲपवरही मतदान केंद्राची माहिती घेता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT