Crime esakal
पुणे

Pune Crime : पुण्यात बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला अटक

पुण्यात आठ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पुण्यात आठ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली.

पुणे - पुण्यात आठ वर्षांपासून बेकायदेशीर वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी तरुणाला पोलिसांनी अटक केली. त्याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट तयार करून दुबई प्रवास केल्याचे समोर आले आहे.

महम्मद अमान अन्सारी (वय २२, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी विशेष शाखेचे पोलिस कर्मचारी केदार जाधव यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेष शाखेकडून शहरातील पाकिस्तानी नागरिकांची माहिती घेत असताना महम्मद अन्सारी याच्याबाबत माहिती मिळाली.

चौकशीदरम्यान, तो बेकायदेशीरपणे वास्तव करीत असल्याचे आढळून आले. महम्मद अन्सारी याची आई मूळ भारतीय आहे. तिचा पाकिस्तानी नागरिक अमान यांच्याशी विवाह झाला होता. विवाहानंतर त्या पाकिस्तानला गेल्या. परंतु कौटुंबिक वादातून आई युएईमध्ये वास्तव्यास आहे. तिने महम्मदसह तिघा भावंडांना २०१५ मध्ये पुण्यात शिक्षणासाठी आजीकडे पाठविले होते. पुण्यात शिक्षण घेत असताना महम्मद याने बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय पासपोर्ट मिळवला. या पासपोर्टच्या आधारे तो आईला भेटण्यासाठी गेल्याचे समोर आले आहे.

कौटुंबिक वादामुळे पुण्यात वास्तव्य

आई युएईमधील एका कंपनीत एचआर विभागात नोकरीस आहे. परंतु कौटुंबिक वाद आणि युएईमधील खर्च परवडत नसल्यामळे तिने महम्मदसह तिघा भावंडांना पुण्यात शिक्षणासाठी पाठविले होते. दर महिन्याला आई महम्मदला शिक्षणासाठी काही रक्कम पाठवत होती. त्याने भारतात वास्तव्याचा कालावधी वाढविण्याबाबत परदेशी नागरिक नोंदणी कक्षाकडे अर्ज केला होता. परंतु त्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. पुढील तपास खडकचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेश तटकरे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT