Palkhi route will become Devotion path said Nitin Gadkari 
पुणे

पालखी मार्ग होणार भक्ती मार्ग ; नितीन गडकरी

सकाळवृत्तसेवा

पुणे : संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गासाठी १२ हजार कोटी रुपये खर्च केला जाणार आहे, त्याचे काम पुढील दीड वर्षात पूर्ण केले जाईल. हा केवळ रस्ता न राहता, महाराष्ट्राची संस्कृती, संतांचे कार्य सांगणारा भक्ती मार्ग करण्याचा प्रयत्न आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.

पुण्यात गुंडांनी दिले पोलिसांनाच आव्हान; दहशत माजवण्याचा प्रयत्न! 

चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाच्या पाहणीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गडकरी यांनी ही माहिती दिली.ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी मार्गावर ४ ठिकाणी काम सुरू आहे. तर तुकाराम महाराज पालखी मार्गावर ३ ठिकाणी कामाचे पुढील दोन महिन्यात सुरू होईल. पालकमंत्री अजित पवार व खासदार गिरीश बापट हे याचे भूमिपूजन पुढील दीड महिन्यात करतील.

केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री हा १२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प यावर्षात पूर्ण करत असून, भाविकांना वर्षभर तेथे दर्शनासाठी जाता येणार आहे. उत्तराखंडमध्ये मानस सरोवरला जाण्यासाठी रस्ता बांधत असून ८५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर आता संत ज्ञानेश्‍वर महाराज व संत तुकाराम महाराज यांचा पालखी मार्ग येत्या दीड वर्षात पूर्ण करू. यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती, वारसा ही संतांचे साहित्य, त्यांच्या कार्याशी जोडलेली आहे. आषाढी वारीला वारकरी जातात त्यांची श्रद्धा जोडलेली असते.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या मार्गावर १२ हजार कोटी रुपये खर्च करत आहोत हे काम करताना तुकाराम महाराज यांनी त्यांच्या अभंगात उल्लेख केलेल्या वनस्पती मार्गात लावाव्यात, त्यांचे अभंग, ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या ओवी त्या महामार्गावर लिहिता येतात का याचा विचार सुरू आहे. पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेले अभंग रस्त्यात नागरिकांना ऐकता येतील का याचा विचार सुरू आहे. त्यासाठी नागरिकांनी त्यांच्या सूचना www.palkhimarg.com या संकेतस्थळावर नोंदवाव्यात. यासाठी तज्ज्ञांची समिती गठित केली जाणार असून, ते सर्व सूचनांचा विचार करून त्यावर निर्णय घेतील.


महाराष्ट्राची संस्कृती व अध्यात्माचा विचार करता या मार्गांचे सुशोभीकरण केले जाईल. तंत्रज्ञानाचा वापर करून तुकाराम व ज्ञानेश्‍वर महाराज यांचे साहित्य लोकांपर्यंत पोहंचेल, प्रवाशांना यासाठी नागरिकांनी सूचना कराव्यात.’’
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT