Palkhi Sohala grand finale of Bhajan Competition will held at Yerawada Jail culture  sakal
पुणे

Palkhi Sohala : येरवडा कारागृहात रंगणार भजन स्पर्धेची महाअंतिम फेरी

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धेत राज्यातील २९ कारागृहांमधील ३५० कैद्यांनी सहभाग घेतला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे आगमन शहरात होत आहे. या पालखी सोहळ्याचे औचित्य साधत कारागृह विभाग आणि शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे कैद्यांसाठी राज्यस्तरीय श्री संत तुकाराम महाराज भजन आणि अभंग स्पर्धेची महाअंतिम फेरी मंगळवारी (ता. १३) येरवडा कारागृह परिसरात होणार आहे,

अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत दिली. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया या वेळी उपस्थित होते.

देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित स्पर्धेत राज्यातील २९ कारागृहांमधील ३५० कैद्यांनी सहभाग घेतला. त्यातून कोल्हापूर, तळोजा, अमरावती, पुणे, नागपूर आणि नाशिक कारागृह संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.

बीड, वर्धा, अलिबाग, ठाणे आणि अहमदनगर जिल्हा कारागृह संघांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येणार आहे. तर सहभागी कैद्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. महाअंतिम स्पर्धेत प्रथम येणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकोबा महाकरंडक,

द्वितीय संघास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक तर तृतीय क्रमांकास संत शेख महम्मद महाकरंडक देण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या कारागृहांना दिना व प्रकाश धारिवाल यांच्यातर्फे कमलाबाई रसिकलाल धारिवाल यांच्या स्मरणार्थ शंभर पुस्तकांचा संच, हार्मोनिअम, तबला, पखवाज, टाळ भेट देण्यात आली आहे.

भजन स्पर्धेतून कैद्यांचे प्रबोधन

भजन स्पर्धेच्या माध्यमातून कैद्यांचे प्रबोधन करण्यासह त्यांचे मानसिक संतुलन चांगले राहावे, असा प्रयत्न आहे. या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला सकाळी ११ वाजता सुरवात होइल. तसेच, सायंकाळी पाच वाजता गृह विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे आणि उद्योजक प्रकाश धारिवाल यांच्या हस्ते स्पर्धेचे पारितोषिक वितरण होणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

अध्यात्मातून मतपरिवर्तन -

  • आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा

  • सकलांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा

  • हित ते करावे देवाचे चिंतन, करूनिया मन एकविध

  • तुका म्हणे लाभ होय तो व्यापार, करा काय फार शिकवावे

  • संत तुकाराम महाराज यांच्या या अभंगानुसार अध्यात्मातून प्रबोधन आणि प्रबोधनातून मतपरिवर्तन या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे खाबिया यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT