market hadpsar.jpg 
पुणे

हडपसरवासियांना आता मिळणार मुबलक भाजीपाला कारण...

सकाळवृत्तसेवा

हडपसर (पुणे) : पंडित जवाहरलाल नेहरू भाजी मार्केट जे गेले अडीच महिने लॅाकडाउनमुळे बंद ठेवण्यात आले होते. ते पुन्हा रविवारपासून सकाळी ९ ते ४ या कालावधीत सुरू होणार आहे. पंडीत नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना, पंडीत जवाहरलाल नेहरू व्यापारी मंडळ, हडपसर टेम्पो संघटना यांनी पुढाकार घेतल्याने आता पुन्हा मंडई ग्राहकांच्या सेवेसाठी नियमितपणे सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

आमदार चेतन तुपे यांनी सर्व शेतकरी व व्यापारी यांची सोशल डिस्टन्स पाळून बैठक घेतली व सर्वांनी सुरक्षितेचे नियम कडकपणे अमलात आणून व्यवसाय करावा व ग्राहकांना चांगली सेवा द्यावी असे आवाहन केले. बैठकीस पंडीत नेहरू भाजीपाला व्यापारी संघटना अध्यक्ष बाळासाहेब भिसे, पंडीत जवाहरलाल नेहरू व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रमोद बडदे, नगरसेवक मारूती तुपे, योगेश ससाणे, उज्वला जंगले, सुनिल बनकर, मंडई अधिकारी बाळासाहेब साबळे, प्रशांत सुरसे, सागरराजे भोसले, सचिन शेवाळे, शातांराम भालसिंग, बंटी हिंगणे, राजेंद्र तुपे, एजस पठाण, विमल आरू, प्रविण टिळेकर, राजू सातव उपस्थित होते. 

कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी मंडईत कडक नियम करण्यात आले आहेत. मंडईमध्ये ९२९ परवानाधारक व्यापारी आहेत. गर्दी वाढू नये यासाठी तीन व्यापा-यांमध्ये एक गाळा दिला जाणार आहे. प्रत्येक गाळ्यात ८ फूट अंतर ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक व्यावसायिकाला हॅंन्डग्लोज आणि मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. वयोवृध्द व्यावसायिकाला परवानगी दिली जाणार नाही. त्या एेवजी त्यांच्या घरातील सक्षम व्यक्तीला गाळा सुरू ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मंडईत येणा-या ग्राहकाला विनामास्क प्रवेश दिला जाणार नाही. लहान मुले, वयोवृध्द आणि आजारी ग्राहकांना प्रवेश देण्यात येणार नाही. ग्राहकांना स्वतःच्या हाताने माल निवडता येणार नाही. मंडईतील दिवसभरातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंडई निरिक्षक निरिक्षण करणार असून नियम न पाळणा-या व्यापा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच रोज महापालिका आयुक्तांना अहवाल सादर करण्यात येणार आहे. मंडईतील कारभार सुरळीत ठेवण्यासाठी एका कोअर कमिटीची निर्मीती करण्यात आली आहे. मंडईच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक नेमण्यात येणार आहेत. गर्दी होऊ नये यासाठी ते ग्राहकांना टप्प्या टप्प्याने मंडईत प्रवेश देणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT