panic among citizens due to sighting of drones in Khalad area of ​​Purandar taluka marathi news  
पुणे

पुणे जिल्ह्यातील खळद परिसरात ड्रोनच्या घिरट्या; नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण

एकाच वेळी आकाशामध्ये चार ते पाच ड्रोन नागरिकांना वेगवेगळ्या दिशेला दिसत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

खळद : खळद (ता. पुरंदर) येथे परिसरामध्ये गेले तीन दिवसापासून रात्री ८ ते १ या कालावधीमध्ये अनेक ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांना दिसत आहे. यामुळे सर्वत्र रात्री आठ वाजले की इकडे ड्रोन आला, तिकडे ड्रोन गेला, या डोंगरावरती ड्रोन खाली उतरला, तर दुसऱ्या डोंगरावरून अवकाशात झेपावला, या ड्रोनची लाईट पांढरी आहे. तर दुसऱ्याची रंगीत आहे अशा वेगवेगळ्या चर्चा रात्रभर रंगत असून नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या अज्ञात ड्रोन बाबत प्रशासनाने खुलासा करावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.

गेले काही दिवसापासून दौंड, बारामती तर पुरंदर तालुक्यातील काही गावामध्ये ड्रोन फिरत असल्याची माहिती नागरिकांना प्रसार माध्यमातून मिळत असतानाच खळद परिसरात खळद, पोमणनगर, पिंपळे, एखतपूर -मुंजवडी, खानवडी व सभोवतालच्या गावांत तीन दिवसापासून ड्रोन दिसू लागले आहेत. यामुळे या भागातील नागरिकांना जागरण करावे लागत आहे.

एकाच वेळी आकाशामध्ये चार ते पाच ड्रोन नागरिकांना वेगवेगळ्या दिशेला दिसत आहेत. याबाबत सासवड पोलीस स्टेशनशी नागरिकांनी संपर्क केला असता त्यांनी हे ड्रोन नसून विमान असल्याची प्राथमिक माहिती नागरिकांना दिली मात्र नागरिकांचे यावर समाधान झाले नसून नागरिकांनी ते खात्रीपूर्वक ड्रोन असल्याचे पोलिसांना सांगत हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. तर एक दोन वेळा सासवड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे गावांमध्ये येऊन त्यांनीही पाहणी केली.मात्र त्यांनी अद्याप पर्यंत हे ड्रोन की विमान याचा अधिकृत खुलासा केला नाही.

याबाबत सरपंच भाऊसाहेब कामथे, माजी सरपंच कैलास कामथे, ग्रामपंचायत सदस्य योगेश कामथे, माजी उपसरपंच सुरेश रासकर, ग्रामसेवक महेंद्र लोणकर, पवन कामथे यांनी सासवड पोलीस स्टेशन येथील पोलीस निरीक्षक अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना सर्व वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला तर हे खात्रीपूर्वक ड्रोन असुन आपण याबाबत तातडीने कार्यवाही करावी यासाठी ग्रामस्थ आपणास सर्वतोपरी सहकार्य करतील असा विश्वास दिला.

पुरंदर तालुक्यात काही भागात ड्रोन गेल्यानंतर चोरीची घटना घडली असल्याची माहिती या भागात नागरिकांच्या मध्ये पसरली असल्याने या ड्रोनच्या माध्यमातून चोरीसाठी टेहाळणी केली जाते की काय? का कोणते सर्वेक्षण सुरू आहे, सर्वेक्षण सुरू असेल तर प्रशासनाला याची माहिती का नाही, ते रात्रीच का येतात, नागरिक दिसल्यावर अचानक लाईट बंद करून गायब का होत आहेत,असे अनेक प्रश्न नागरिकांना पडत असल्यामुळे सर्व नागरिक रात्रीचे घराच्या बाहेर जागे राहत आहेत. याबाबत तहसीलदार पुरंदर यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Insurance Sector: मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! १००% FDI ला मंजुरी; इंश्योरन्स क्षेत्रात मोठा धमाका, पण LIC साठी नियम वेगळे

रितेश देशमुखने घेतलं पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं दर्शन, म्हणाला...'माझे वडिल विलासराव देशमुख यांना...' Viral Video

nasrapur case updates: 'माझ्या मुलीला न्याय मिळेपर्यंत.. पीडित मुलीच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया...

Pune ATS Arrest: येरवडा जेलमधून पळाल्यानंतर ६ वर्षे फरार राहिलेला मोक्का आरोपी अजिंक्य कांबळे एटीएसच्या सापळ्यात

Latest Marathi News Live Update : नीलम गोऱ्हे यांची सोशल मीडियावरील गैरवापराबाबत तीव्र प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT