Panic in Citizen due to breaking glass and vehicles of Bibwewadi petrol pump 
पुणे

पुण्यात पुन्हा दहशत पसरविण्याचा प्रयत्न; बिबवेवाडीत पेट्रोल पंपाच्या व गाड्यांच्या काचा फोडल्या

नितिन बिबवे

बिबवेवाडी(पुणे)  : महेश सोसायटी चौकातील पेट्रोल पंपच्या तीन मशीनच्या काचा फोडण्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. पापळवस्ती व चांगुणाई नगर येथे तीन चाकी व चार चाकी वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या.

चांगुणाई नगरमध्ये एक दुचाकी, एक चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या, तसेच एका घरावर दगडफेक करत दहशत निर्माण केली. पापळवस्तीतील एक रिक्षा व तीनचाकी टेम्पोच्या काचा फोडल्या. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काही दिवसांपूर्वी येथे दोन रिक्षाच्या काचा फोडण्याची घटना घडली होती. काचा फोडण्याच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. गाड्या फोडल्याची माहिती मिळताच बिबवेवाडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. परिसरात दहशत निर्माण करणाऱ्यांचा तपास पोलिस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune University: चला रे पोट्टेहो कुलगुरूंच्या घरी जेवायला... पुणे विद्यापीठात गॅस संपला? विद्यार्थ्यांचा इशारा! खानावळी बंद होणार?

'ऑपरेशन सिंदूर'ची खिल्ली ते शिखर धवनचं तोंड फोडण्याची इच्छा! Abrar Ahmed चे कारनामे माहित असूनही काव्या मारन अशी का वागली?

Mojtaba Khamenei : इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई कोमात ? पाय कापल्याच्या दाव्याने खळबळ

Tajmahal Name: ताजमहलचे नाव बदलणार? मोदी सरकारचा सर्वात मोठा खुलासा! संसदेत दिले थेट उत्तर

'लग्नानंतर होईलच प्रेम'फेम काव्याच्या रिअल लाईफ बाबांनी सगळ्यासमोर केली पोलखोल, डोक्यावर हात मारत म्हणाले...'ही नुसती...'

SCROLL FOR NEXT