leopard.jpg 
पुणे

भीतीने थरकाप उडालेला शेतकरी म्हणाला, दहा फुटांवरून जणू मृत्यूच समोर येत होता...

सिध्दार्थ कसबे

पिंपळवंडी (पुणे) : हल्ला करण्यासाठी दबा धरून चालत येत असलेल्या दहा फुटांवरील बिबट्याला पाहून जोरात ओरडल्यामुळे बिबट्या पळून गेला. मात्र, साक्षात मृत्यूच जवळून पाहिल्याचे पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील शेतकऱ्याने थरकाप उडवणारा अनुभव आल्याचे सांगितले.   

पिंपळवंडी येथील रतन कसबे व त्यांचा मुलगा साहिल हे मंगळवारी (ता. २२) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास गायीला गोठ्यात बांधत होते. त्यावेळी साहिल याने एक गाय सोडून गोठ्यात नेली व रतन हे दुसऱ्या गाईला धरून उभे होते. तेवढ्यात गाईने हंबरडा फोडला. गाय का घाबरली, हे रतन यांनी पाहताच अगदी १० फूट अंतरावर घर बांधण्यासाठी तयार केलेल्या चौथऱ्यावरून एक बिबट्या त्यांच्याकडे शिकारीच्या मुद्रेत हळूवारपणे दबा धरून चालत येताना त्यांना दिसला. बिबट्याला पाहताच त्यांनी मोठ्याने ओरडायला सुरवात केली. अचानक झालेल्या आवाजाने बिबट्या तेथून पळून गेला. 

या आवाजाने रतन यांच्या घरातील सर्व जण बाहेर आले. विशाल कसबे व साहिल कसबे यांनी बिबट्याला पळवून लावण्यासाठी फटाके वाजवले. परंतु, दहा मिनिटांनी बिबट्या पुन्हा त्यांच्याकडे येताना त्यांना दिसला. त्याला पाहताच सर्वांनी मोठ्याने आवाज केला. काठ्या जमिनीवर आपटल्या. त्या आवाजाने तो निघून गेला व सर्वांनी तात्पुरता सुटकेचा निःश्वास सोडला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
    
याबाबत रतन कसबे यांनी सांगितले की, दररोज घराच्या बाजूला व शेतामध्ये आम्हाला बिबट्याची पावले दिसत असतात. यापूर्वी अनेक वेळा त्याचे लांबून दर्शनही झाले आहे. परंतु, आज साक्षात मृत्यूला एवढ्या जवळून पाहिल्याने मनात खूप भीती निर्माण झाली आहे. बिबट्या पूर्ण वाढ झालेला आहे. आज जर माझे बिबट्याकडे लक्ष गेले नसते, तर गाईवर किंवा माझ्यावर सुद्धा हल्ला झाला असता. 

 

पिंपळवंडी परिसरात अनेक पाळीव प्राण्यांवर बिबट्याचे हल्ले झालेले असून यात शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. बिबट्याचा वावर वाढत असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडायला भीती वाटू लागली आहे. वनविभागाने लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावावा. 
 - रतन कसबे, शेतकरी, पिंपळवंडी (ता. जुन्नर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांना दारू, अंडी-टोमॅटो देण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याला घेतलं पोलिसांनी ताब्यात

Nanded Cashew Almond Video : नांदेडच्या बैठकीतील काजू-बदामाचा व्हिडीओ व्हायरल; हिंगोलीत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांसमोर बशी ठेवत केला निषेध

Hyundai Bayon SUV: ऑटो बाजारात Hyundai चा धमाका; नव्या 'बेयॉन' SUV च्या लूक अन् डिझाइनचे पहिले स्केच आउट!

Raj Thackeray UPI : युपीआयवरील MDR म्हणजे ‘डिजिटल सापळा’; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, व्यापाऱ्यांना शुल्क न भरण्याचं आवाहन

Latest Marathi News Update : मालकाच्या मुलीचा WhatsApp DP पाहिला अन् 3.70 कोटी पाठवले

SCROLL FOR NEXT