Panjabrao Dakh Sakal
पुणे

निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे अवेळी पाऊस - पंजाबराव डख

निसर्गाचा ऱ्हास होऊन समतोल बिघडल्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढुन निसर्ग आता त्याचे रुद्ररूप दाखवू लागला आहे.

प्रताप भोईटे

न्हावरे : मागील काही वर्षांपासून जंगलतोड होऊन त्याजागी प्रदुषीत कंपन्या त्याचबरोबर सिमेंटची जंगले उभी राहिली एकुणच निसर्गाचा ऱ्हास होऊन समतोल बिघडल्यामुळे पृथ्वीवरील तापमान वाढुन निसर्ग आता त्याचे रुद्ररूप दाखवू लागला आहे. त्यामुळे अवेळी पाऊस व हवेतील वातावरण सातत्याने बदलत असल्याचे मत प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाबराव डख पाटील यांनी बोलताना व्यक्त केले. (Panjabrao Dakh)

शिरूर तालुक्यातील चिंचणी येथे सुनंदा ऍग्रो एजन्सीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरूवर्य संभाजी(तात्या) पवार होते. श्री डख पुढे बोलताना म्हणाले की निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे पाऊस होतोय पण अलिकडच्या काळात ढगफुटी सारख्या (पावसाचे) प्रमाण वाढले आहे त्यामध्ये सुसुत्रता आणायची असेल तर वृक्षारोपन करून झाडांची संख्या वाढवणे गरजेचं आहे.

यावेळी डख पाटील यांनी शेतकऱ्यांना हवामानाबद्दल अचूक सल्ले आणि काही ठोकताळे सांगितले यावेळी शिवकुमार देशमाने, ज्ञानेश्वर ढवले, शामराव पवार, दादा पवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिरूर बाजार समितीचे संचालक सतिश कोळपे, न्हावरे तंटामुक्ती चे अध्यक्ष दिनेश दरेकर, बापुसाहेब काळे, राजहंस काळे, जयराम भगत,उपस्थित होते. प्रास्ताविक विकास पवार सूत्रसंचालन अनिल पवार आभार वैभव पवार यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT