पुणे

Loksabha 2019: चिंचवड आणि पनवेल ठरविणार कोण होणार मावळचा खासदार

उत्तम कुटे

पिंपरीः मावळचा नवा खासदार कोण होणार हे चिंचवड आणि पनवेल हे दोन मोठे विधानसभा मतदारसंघच निश्चित करणार आहेत. कारण मावळमध्ये झालेल्या एकूण मतदानापैकी 42 टक्के मतदान या दोन मतदारसंघात झाले आहे. योगायोगाने या दोन्ही ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत. ही बाब मावळमधील शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या पथ्यावर पडणार की कसे होणार? हे 23 मे रोजी स्पष्ट होईल. 

पनवेल हा मावळच नव्हे, तर राज्यातील सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ आहे. मावळमधील एकूण 22 लाख 97 हजार 405 पैकी13 लाख 86 हजार 818 मतदारांनी काल (ता.30) मतदान केले. त्यातील पनवेल व चिंचवड या सहापैकी दोन विधानसभा मतदारसंघातील मतदान केलेल्या मतदारांची संख्या ही पाच लाख 81 हजार 353 आहे. त्यामुळे या मतदारसंघात होणारे मतदान आणि मिळणारे लीड हे मावळचा नवा खासदार कोण हे ठरविणार आहे.

चिंचवडमध्ये लीड हे शिवसेनेला उमेदवाराला मिळणार हे उघड गुपित आहे. कारण तेथे या निवडणुकीनंतरची राजकीय समीकरणे दडलेली आहेत. संभाव्य राज्य मंत्रीमंडळ विस्तारात चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे नाव घेतले जात आहे. त्यासाठी त्यांना चिंचवडमधून शिवसेना उमेदवाराला इच्छा नसली, तरी लीड द्यावे लागणार आहे. ते देण्याएवढी त्यांची ताकद व वरचष्मा मतदारसंघात टिकून आहे. मात्र, पनवेलमध्ये, जरी भाजपचे आमदार असले, तरी तेथे शेकापचे मोठे वर्चस्व आहे. शेकापचे आमदार व सरचिटणीस जयंत पाटील यांचा वरचष्मा तेथे आहे. तेथील बहुतांश आगरी मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे. तसेच त्यांनीच मागणी केल्याने मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परिणामी त्यांना तेथून पार्थ यांना लीड द्यावेच लागणार आहे. तो त्यांचा प्रतिष्ठेचा प्रश्न झालेला आहे. त्यामुळे जगताप हे बारणेंना किती लीड देतात आणि पाटील हे पार्थला किती मताधिक्य देतात यावर मावळचा निकाल फिरणार आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात, मात्र काट्याची लढाई होईल, असा अंदाज आहे.

काल झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी आज जाहीर केली. गतवेळपेक्षा एक टक्का कमी मतदान मावळमध्ये झाले आहे. तसेच घाटावरील तीन विधानसभा मतदारसंघापेक्षा घाटाखालील मतदारसंघात ते जास्त मतदानाचा टक्का आहे. घाटाखालील कर्जत-खालापूर येथे सर्वाधिक 67.76 टक्के, तर सर्वात कमी मतदान घाटावरील पिंपरी या राखीव मतदारसंघात झाले आहे. कर्जतला राष्ट्रवादीचा, तर पिंपरीत शिवसेनेचा आमदार आहे. त्यामुळे कर्जतला झालेले जास्त व पिंपरीत झालेले कमी मतदान राष्ट्रवादीला हात देईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. घाटाखालील उरण दुसऱ्या, तर घाटावरील मावळ तिसऱ्या क्रमांकावर आहे. मावळात भाजपचा, तर उरणला शिवसेनेचा आमदार आहे. उरणला शिवसेना आमदार असला, तरी गत लोकसभेला तेथे पक्ष पिछाडीवर होता. मावळात ग्रामीण भागात झालेले अधिक मतदान ही बाबही राष्ट्रवादीच्या दृष्टीने जमेची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT