Shital Mahajan Sakal
पुणे

नऊवारी नेसून पॅराजम्पिंग; पुण्याच्या शीतल महाजनचा राष्ट्रीय विक्रम

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने पॅरामोटार मधून नऊवारी साडी घालत पॅराजंम्पचा अनोखा राष्ट्रीय विक्रम पुण्यातील एका महिलेने केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने पॅरामोटार मधून नऊवारी साडी घालत पॅराजंम्पचा अनोखा राष्ट्रीय विक्रम पुण्यातील एका महिलेने केला आहे.

पुणे - स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने पॅरामोटार मधून नऊवारी साडी (Nauwari Saree) घालत पॅराजंम्पचा (Parajump) अनोखा राष्ट्रीय विक्रम (National Record) पुण्यातील एका महिलेने (Women) केला आहे. शीतल महाजन (राणे) (Shital Mahajan Rane) यांनी हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथून पॅरामोटारच्या साहाय्याने पाच हजार फुटांवरून पॅराजंम्प केले असून नऊवारीत हा प्रयोग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला (First Indian Women) आहेत. यामुळे पुणेकरांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.

या ग्लायडिंग सेंटरमध्ये २६ जानेवारी रोजी पॅरामोटरिंग आणि एरो मॉडेलिंग या हवाई खेळांचे चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. त्यात शीतल महाजन यांच्या पॅराजंम्पने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आतापर्यंत शीतल यांच्या नावावर १८ राष्ट्रीय आणि सहा जागतिक विक्रम प्रस्थापित आहेत. केंद्र सरकारतर्फे २०११ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जगातील सात खंडात स्कायडायव्हिंग करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत. याचीच दखल घेत फेडरेशन ऑफ एरोनॉटिकल इंटरनॅशनल यांनी सबिहा गोकसेन सुवर्ण पदक देऊन शीतल यांना गौरविले आहे.

याबाबत शीतल महाजन यांनी सांगितले, ‘सर्वसामान्य कुटुंबातून स्कायडायव्हिंग खेळात (पॅराशूट जम्पिंग) पुढे येत आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या स्पर्धेत मी सहभागी झालेली आहे. आतापर्यंत साडी घालून मी भारताबाहेर अनेक ठिकाणी स्कायडायव्हिंग केले. परंतु, प्रथमच भारत देशात माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी असलेल्या पुणे शहरात नऊवारी साडी घालून पॅरामोटारमधून पॅराजम्पिंग केल्याने ही विशेष पॅराजम्प माझ्यासाठी अविस्मरणीय ठरली आहे.’’

अशी केली पॅराजम्प...

पॅरामोटरचे पायलट रॉन मेनेज हे एक पॅरामोटर इन्स्ट्रक्टर आहेत यांच्या पॅरामोटारमधून आम्ही जमिनीपासून आकाशात पाच हजार फुटांवर गेलो. त्याठिकाणी पॅरामोटार मधून मी बाहेर पडत आकाशात पक्ष्यासारखी झेप घेतली. जमिनीच्या दिशेने वेगात येत असतानाच साडेतीन हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडले. अशाप्रकारे पॅरामोटारमधून पॅराशूट जम्प केले. या उपक्रमासाठी ग्लायडिंग सेंटर हडपसर पुणेचे अधिकारी शैलेश चारभे यांचे विशेष सहकार्य लाभले. असे महाजन यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithvi Shaw: ठरलं! मुंबई सोडलेल्या पृथ्वी शॉला मिळाला नवा संघ, आता ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार

Latest Maharashtra News Updates : एरंडोल तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी समाधानकारक पाऊस

Video: धक्कादायक! रिलसाठी अल्पवयीन मुलाने ट्रेन ट्रॅकवर जीव धोक्यात टाकला, व्हायरल व्हिडिओ

सुलतानला नऊ वर्षं पूर्ण ! सलमानने सिनेमासाठी स्वतःमध्ये घडवलेले हे पाच बदल

Tahawwur Rana : 26/11 दहशतवादी हल्ला प्रकरणी महत्त्वाची अपडेट; तहव्वूर राणानं दिली हल्ल्याची कबुली, नेमकं काय केला खुलासा?

SCROLL FOR NEXT