पुणे

आळंदी परिसरातील डाॅ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पिस स्कूलमधील पाल्यांचे पालक झाले आक्रमक 

विलास काटे

अाळंदी : कोरोनाच्या पार्श्वभुमिवर आॅनलाईन पद्धतीने शिकवण्याच्या नावाखाली अवाजवी शुल्क आकारणीच्या विरोधात पालकांनी ही शाळाच नको अशी भुमिका घेतली. आणि सुमारे सत्तर पालकांनी पाल्याचे दाखले देण्याची मागणी केली.हि घटना आळंदी जवळील केळगावमधील डाॅ. विश्वनाथ कराड वर्ल्ड पिस स्कुलमध्ये घडली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत पालकांपैकी संदिप नाईकरे, ज्ञानेश्वर क्षिरसागर,विष्णु वाघमारे किरण येळवंडे म्हणाले, आॅनलाईनच्या नावाखाली सत्तर हजारहून अधिक शुल्क आकारले. लाॅकडाउन काळात गेली सहा महीने अनेकांना रोजगार नसल्याने शुल्कासाठी सवलतीची मागणी पालकांनी विद्यालयाकडे  केली होती. तरीही शाळा व्यवस्थापनने  पालकांच्या मागणीचा विचार केला नाही.

शाळा व्यवस्थापनने शुल्क कमी करण्यास नकार दिल्याने शेवटी पालकांनी सामुहीकरित्या मुलांना शाळा नकोच ..आम्हाला आमचे दाखले द्या. असा आक्रमक पवित्रा घेतला. पहिल्याच टप्यात जवळपास सत्तर पालकांनी मुलांचा प्रवेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहीती नाईकरे यांनी दिली. मुख्यमंत्री, पालकमंत्री तसेच शिक्षणमंत्री यांना देखील निवेदन देणार असल्याचे नाईकरे यांनी सांगितले.  

याबाबत शाळेचे मुख्याध्यापक हाजरा सुर्वे म्हणाल्या, ''सत्तरपैकी 49 जणांनी दाखल्याबाबत विचारणा केली. अनेक पालकांनी मागील वर्षीचे शुल्क भरले नाही. चालू वर्षी एप्रिल महिन्यात शाळा सुरु करुन आॅनलाईन शिक्षण सुरु ठेवले. चालू वर्षाचीही शुल्क दिले नाही. शाळेला पगार, व्यवस्थापन, सुविधा यावर खर्च करावा लागतो. मग पालकांच्या म्हणण्यानुसार वीस हजारात शाळा कशी चालवणार. शाळा सोडून जाण्यास कोणालाही बोललो नाही. पालकांचा वैयक्तिक निर्णय आहे. पालकांशी शाळेने वारंवार संवादही साधला. पंधरा टक्के शुल्कात सवलतही दिली. तरीही पालक ऐकायला तयार नाहीत. सहाशे विद्यार्थी असून, केवळ सत्तर लोकच तक्रार करुन शांतता भंग करत आहेत.''
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VHP Garba Ban : गरब्यात मुस्लिमांना बंदी घालण्याच्या विश्व हिंदू परिषदेच्या मागणीला केंद्रीय मंत्र्यांचा विरोध; संविधानाचा दिला दाखला

'बोक्या सातबंडे' चित्रपटात पेपर विकणाऱ्या अभिनेत्याला ओळखलंत का? आज मराठीसोबतच बॉलिवूडही गाजवतोय, कोण आहे हा?

Marathi News Live Updates : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह उज्जैन ते अयोध्या पदयात्रा काढणार

Nanded News : नवसंशोधनाला मिळणार नांदेडची प्रयोगभूमी; ग्रामीण टेक्निकल कॅम्पसकडे ‘आविष्कार २०२६’ची धुरा!

Ambad News : तलावात खांदेमळणीला गाय, बैल धूण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय सौरभ नरोडेचा पाण्यात बुडून मृत्यू; धनगरपिंपरीसह परिसरात हळहळ व्यक्त

SCROLL FOR NEXT