parents death due to corona but student gave ssc exam and success in their examination pune
parents death due to corona but student gave ssc exam and success in their examination pune sakal
पुणे

कोरोनामुळे पितृ छत्र हरपले : मात्र हार न मानता दहावीच्या परीक्षेत मिळवले उत्तुंग यश

रवींद्र पाटे

नारायणगाव : कोरोनाच्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेत आई, वडील किंवा दोघांचे निधन झाले. पितृ छत्र हरपल्याने शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांनी मानसिक आधार दिला. मात्र प्रत्यक्ष मदत करण्याची वेळ आली तेंव्हा बहुतेकांनी हात वर केले. या प्रतिकुल परिस्थितीत काही मुलांनी पडेल ते काम करून आई च्या भक्कम पाठबळावर दहावीच्या परीक्षेत यश मिळवले आहे.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करून दहावीच्या परीक्षेत या मुलांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.मात्र या विद्यार्थ्यांपुढे आता पुढील उच्च शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. संस्था चालकांनी आशा मुलां बाबत सहानुभूती दाखवून किमान शैक्षणीक फी माफ करून त्यांच्या पंखाना बळ द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

न्यू इंग्लिश स्कूल निमगिरी (ता. जुन्नर) विद्यालयातील जान्हवी विठ्ठल कालेकर या विद्यार्थ्यांनीने दहावीच्या परीक्षेत ९०.६० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे. जान्हवीचे वडील शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कोरोनामुळे तिच्या वडिलांचे निधन झाले. वडिलांचे छत्र हरपल्यामुळे कुटुंबावर मोठे संकट कोसळले. शिवणकाम व मजुरी करून जान्हवीची आई दोन मुलांचा उदरनिर्वाह करत आहे.या प्रतिकुल परिस्थितीत जान्हवीने दहावीचा अभ्यास करून मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन उच्च शिक्षण घेण्याची जान्हवीची इच्छा आहे. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे जान्हवीचे पुढील उच्च शिक्षण कसे पूर्ण करायचे या चिंतेने जान्हवीची आई जयश्री या चिंतेत आहेत.

उंब्रज क्र.१( ता. जुन्नर) येथील श्री महालक्ष्मी विद्यालयातील सानिका दिनकर हांडे हिने दहावीच्या परीक्षेत ९०.२० टक्के गुण मिळवून उत्तुंग यश संपादन केले आहे. सानिकाचे वडील दिनकर हांडे अल्पभूधारक शेतकरी असून शेती करूनच ते कुटुंबाची उपजीविका करत होते.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचे निधन झाले.सानिकाची आई शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. आईला घरकाम व शेती कामात मदत करून प्रतिकूल परिस्थितीत सानिकाने अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. शाळेमध्ये सर्वाधिक गुण मिळवून यश संपादन केले. सानिकाची डॉक्टर होण्याची इच्छा आहे.सानिका नारायणगाव येथील गुरुवर्य रा. प.सबनीस विद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेणार आहे.आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे प्रवेश फी माफ करावी. पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळावी. अशी अपेक्षा सानिकाच्या आईने व्यक्त केली आहे.

राजुरी( ता.जुन्नर) येथील विद्या विकास मंदिर विद्यालयातील गौरी सुनील हाडवळे हिने दहावीच्या परीक्षेत ७२.८८ टक्के गुण मिळवले आहेत. गौरीला लहान बहिण असून ती पहिली इयत्तेत आहे. वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्याने गौरीची आई मोलमजुरी करून दोन्ही मुलांचं पालनपोषण करत आहे.गौरी लग्न समारंभामध्ये वाढपे म्हणून काम करून आईला मदत करत आहे.गौरीची अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्याची इच्छा असून बेल्हे येथील समर्थ अभियांत्रिकी महाविद्यालय कॉम्प्युटर डिप्लोमा कोर्सला प्रवेश घेणार आहे.संस्थेचे अध्यक्ष वल्लभ शेळके यांनी गौरीची फी माफ करून तिच्या पंखाना बळ द्यावे. आशी अपेक्षा तिच्या आईने व्यक्त केली आहे.

शेतमजुरी करत असलेल्या वडिलांचे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत निधन झाले असताना शिरोली बोरी (ता. जुन्नर) न्यू इंग्लिश स्कूल मधील स्वराली संजय सोनवणे हिने परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत ७९.४० टक्के गुण मिळवले आहेत.तिची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. स्वराली आळे येथील विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेणार आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पुढील शिक्षणासाठी मदत व्हावी.अशी अपेक्षा स्वरालीच्या आईने व्यक्त केली आहे.

उदापूर( ता.जुन्नर) येथील सरस्वती विद्यालयातील समर्थ कैलास भोकरे याने दहावीत ८९.४० टक्के गुण मिळवले आहेत. कैलास भोकरे उदापूर ग्रामपंचायतीत शिपाई या पदावर कार्यरत असताना कोरोनामुळे त्यांचे निधन झाले आहे. समर्थची आई मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. समर्थ हा मासेमारी करून कुटुंबाला हातभार लावत आहे. त्याला पुढील शिक्षण घ्यायची इच्छा आहे. मात्र आर्थिक परिस्थिती नसल्याने शिक्षण कसे घ्यायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ओतुर येथील सावित्रीबाई फुले विद्यालयातील दीपक मनोज चव्हाण याचे आई व वडिल यांचे कोरोनामुळे निधन झाले. चव्हाण कुटुंब मूळचे उत्तरप्रदेश येथील आहे. मागील पंचवीस वर्षा पासून ते ओतुर येथे वास्तव्यास आहे.मनोज चव्हाण हे हमाली करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आई व वडील यांच्या निधनानंतर दीपक याने पडेल ते काम करून दहावी इयत्तेत ४४ टक्के गुण मिळवले आहेत.सद्यस्थितीत दीपक याचा मोठा भाऊ हमाली करत असून दीपक हा स्वतः घरी स्वयंपाक करून मजुरी करत आहे. आर्थिक मदत झाली तर पुढील शिक्षण पूर्ण करण्याची दीपक याची इच्छा आहे.

महेंद्र गणपुले( प्रवक्ते - मुख्याध्यापक महासंघ ): कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपल्यामुळे लहान वयात हजारो मुलांचे पुढील भविष्य अंधकारमय झाले आहे. ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालयात पाचवी ते दहावी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांना परिसरातील महाविद्यालयात विनाशुल्क प्रवेश देऊन त्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.( प्रवक्ते - मुख्याध्यापक महासंघ ): कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपल्यामुळे लहान वयात हजारो मुलांचे पुढील भविष्य अंधकारमय झाले आहे. ओझर येथील श्री विघ्नहर विद्यालयात पाचवी ते दहावी इयत्तेत शिक्षण घेत असलेल्या नऊ विद्यार्थ्यांच्या पालकांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.पालकांचे छत्र हरपलेल्या मुलांना परिसरातील महाविद्यालयात विनाशुल्क प्रवेश देऊन त्यांचे आयुष्य प्रकाशमय करण्यासाठी मदत करणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT