School-Students 
पुणे

पालकांनो, मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्या, कारण...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "वाढत्या टाळेबंदीमुळे मुलांच्या बालवयात शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेत मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. त्या दृष्टीने पालकांनी या मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याचा पर्याय अवलंबवावा," असे मत अर्ली चाइल्डहूड असोसिएशन इंडिया या संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉ. स्वाती पोपट वत्स यांनी व्यक्त केले आहे.

लहान मुलांची काळजी घेत त्यांना अगदी बालवयातच शिक्षण दिले, तर त्यातून त्यांचा सर्वांगीण व व्यापक स्वरुपाचा विकास होतो, असे भारताच्या ‘अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन’ (ईसीसीई) यामध्येही अंतर्भूत आहे. कौटुंबिक वातावरणात लहान मुलांची काळजी उत्तम प्रकारे घेतली जाते. परंतु बर्‍याच कुटुंबांना आपल्या मुलाच्या चांगल्या विकासासाठी, विशेषत: कोविड-19 च्या साथीच्या काळात, सहाय्यक उपायांची आवश्यकता भासत आहे. 

पहिल्या पाच वर्षांत लहान मुलाच्या मेंदूचा ९० टक्के विकास होतो, असे ‘न्यूरोसायन्स’ने सिद्ध केले आहे. याचा अर्थ, मुले पहिल्या पाच वर्षांत जलद शिक्षण घेण्यास सर्वात जास्त सक्षम असतात. लहान मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्यामुळे संगणकाच्या किंवा मोबाईलच्या स्क्रीनसमोर ही मुले जास्त काळ राहतील व हे मुलांसाठी हानिकारक असल्याचे काहीजणांचे म्हणणे आहे.

बालवाड्या आणि अंगणवाड्या यांनी लहान मुलांशी दररोज कोणत्या तरी मार्गाने विकासात्मकदृष्ट्या योग्य असा संवाद साधायला हवा. ही मुले गाणी गातील, गोष्टी सांगतील, खेळ खेळतील, योगासने शिकतील, हसतील, हसवतील, वस्तू मोजतील, रंग सांगतील, अक्षरे ओळखतील. अशा अनेक प्रकारे या मुलांना खेळवता व शिकवता येईल. त्यासाठी दिवसातला केवळ एक तास व्हिडिओ चॅटच्या स्वरुपात या मुलांना स्क्रीनसमोर घालविण्यास कोणाची हरकत नसावी.

या एका तासात मुलांना बरेच काही मिळू शकेल, अशी शिफारस अर्ली चाईल्डहूड असोसिएशनने केली आहे, असे डॉ. स्वाती यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT