school 
पुणे

आता या शाळांना कारायचे तरी काय?...

सकाळवृत्तसेवा

वडगाव मावळ : लॉकडाऊनमुळे उद्योग-व्यवसाय ठप्प झाल्याने सर्व सामान्य नागरिकांची झालेली आर्थिक कुचंबणा लक्षात घेऊन एकीकडे शासन विविध सवलती जाहीर करून नागरिकांना दिलासा देत असताना मावळ तालुक्यातील काही खासगी शाळांनी मात्र फी भरण्यासाठी पालकांकडे तगादा सुरु केला आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गेल्या महिनाभरापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे मावळ तालुक्यातील उद्योग-व्यवसाय ठप्प झाले आहेत. रोजगार नसल्याने अनेक गरीब लोकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्न मध्यमवर्गीयांना पडला आहे. त्यामुळे शासनाने काही सवलती जाहीर करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.

त्यात बँकांचे हप्ते, घरभाडे तीन महिन्यांनी भरण्याबाबतच्या सवलतींचा समावेश आहे. सर्व सामान्यांच्या कसोटीच्या या काळात काही खासगी शाळा मात्र जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत असताना दिसत आहेत. गेल्या दीड महिन्यांपासून शाळा बंद असताना व यापुढील काळात त्या कधी सुरु होतील याची शास्वती नसताना त्यांनी दोन महिन्यांची फी व बस भाडे येत्या ३० तारखेपर्यंत ऑनलाइन भरण्याचा मेसेज पालकांना पाठवला आहे.

दरम्यान, या असंवेदनशीलपणामुळे पालकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. शिक्षण विभागाने याबाबत लक्ष घालून सर्वच शाळांना समज द्यावी. बंदच्या काळातील फी व बसभाडे माफ करावे. उर्वरित फी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी व समस्त पालकवर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Kisan Yojana: खुशखबर! 'या' महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात येणार २००० रुपये; किसान योजनेबाबत मोठी अपडेट समोर

Nitesh Rane, Disha Salian case : आदित्य ठाकरे दिशा सालियान प्रकरणावर नितेश राणे तोंड सांभाळणार, थेट सांगून टाकलं 'धन्यवाद'...

Pathardi Bribery Case : पाथर्डीत अडीच लाखांची लाच घेताना पोलिस अटकेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Kolhapur Rain Alert : घाट माथ्यासह कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचं कमबॅक! पुढील चार दिवस 'या' मुदतीत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

Marathi News Live Updates : कुलाब्यातील गणेशोत्सव मंडळाच्या तक्रारीवरून संजय राऊत आक्रमक; थेट मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं पत्र

SCROLL FOR NEXT