Pune-Municipal 
पुणे

पुणे शहरातील उद्याने महिनाभर बंदच राहणार

सकाळवृत्तसेवा

पुणे - शहरातील उद्याने सुरू करण्याचा पुणेकरांचा आग्रह असला; तरी ती येत्या ३० ऑक्‍टोबरपर्यंत बंदच राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. मनोरंजनाची ठिकाणे सुरू करण्यास राज्य सरकारने नकार दिल्याचे सांगत, उद्यानाचा निर्णय होणार नसल्याचेही सांगण्यात आले. उद्याने उघडण्याच्या हालचाली महापालिकेने गेल्या आठवड्यात केल्याने पुणेकरांत उत्सुकता होती. मात्र ती आता आणखी महिनाभर तरी बंद राहतील. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोना आणि त्यानंतरच्या लॉकडाउनमुळे गेल्या सहा-साडेसहा महिन्यांपासून सर्व उद्याने पूर्णपणे बंद आहेत. अनलॉकच्या पाचव्या टप्प्यात बहुतांशी व्यवहार सुरू झाल्याने उद्याने, मैदाने खुली करण्याची मागणी पुणेकरांची आहे. त्यानुसार काही बंधने घालून उद्याने उघडता येतील का, या दृष्टीने महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यासाठी बैठक घेऊन निर्णय जाहीर करू, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जाहीर केले होते. परंतु, कोरोनाचा संसर्ग, त्याचे परिणाम आणि उद्याने उघडल्यानंतरच्या संभाव्य परिणामांचा विचार करून निर्णय घेणार असल्याचे मोहोळ यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतरी उद्याने उघडण्याला पुणेकरांची सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून आले. 

मात्र अनलॉकच्या पाचव्या टप्प्याची नियमावली जाहीर करताना मनोरंजनाची ठिकाणे येत्या ३० ऑक्‍टोबरपर्यंत बंद असतील, असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे विविध भागांमधील १९० उद्याने अजूनही बंदच राहणार आहेत.

राज्य सरकारच्या आदेशानुसार पुणेकरांना नव्या काही सवलती देण्याचा निर्णय झाला आहे. त्यात उद्याने सुरू करण्याचा आदेश नाही. त्यामुळे पुढचे काही दिवस उद्याने बंद ठेवणार आहेत.
- अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख, पुणे महापालिका

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT