Murlidhar_Mohol 
पुणे

पुणे : उद्यानांबाबत महापौर मोहोळ यांचा मोठा निर्णय; वाचा काय म्हणाले महापौर

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली उद्याने येत्या १ नोव्हेंबरपासून खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच आदेश महापालिकेकडून लवकरच काढला जाईल,' अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

कोरोना संसर्ग सुरु झाल्यापासून शहरातील सर्व उद्याने बंद ठेवण्यात आली होती. मात्र, आता कोरोना संसर्ग बऱ्यापैकी आटोक्यात असताना उद्याने खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतच्या सूचना महापौर मोहोळ यांनी दिल्या आहेत. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी अटी आणि शर्थीच्या आधारावर उद्याने खुली केली जाणार आहेत.

महापौर मोहोळ पुढे म्हणाले की, 'गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत पुणेकरांनी महापालिका प्रशासनाला उत्तम सहकार्य केले. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आता पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. त्यामुळे काही नियम घालून उद्याने सुरू करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. ते नियम तंतोतंत पाळणे आवश्यक आहे.'

'केंद्रीय पथकाने शहरातील कोरोना संसर्गाचा आढावा घेतल्यानंतर डिसेंबर-जानेवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर उद्यानात वावरताना पुणेकरांनी योग्यप्रकारे आपली काळजी घ्यावी. काळजी उत्तम प्रकारे घेतल्यास आपल्याला कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात सहज यश मिळू शकते', असेही महापौर म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sindhudurg ZP : मार्च २०२६ची डेडलाईन जवळ; सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या २५ कोटी निधीवर ‘काउंटडाउन’ सुरू!

PAK vs ENG, T20 WC: पाकिस्तानचा दुसरा सामनाही रद्द झाला तर? मुंबईतील उपांत्य फेरीचा सामना दुसरीकडे नाही खेळवावा लागणार; जाणून घ्या गणित

तिने ज्या हिमतीने परिस्थिती सांभाळली... विकी कौशलने केलं नवी आई कतरीनाचं कौतुक; म्हणतो- बाळासाठी...

Farmer Protest : कर्जमाफीत पळवाटा शोधू नका; शेतकरी संघटनेचा राज्य सरकारला 'न भूतो न भविष्यती' आंदोलनाचा इशारा

Latest Marathi News Live Update : अवकाळी पावसाचा लातूर जिल्ह्याला फटका,14 हजार 672 हेक्टर वरील रब्बी पिकांचे नुकसान

SCROLL FOR NEXT