SPPU sakal media
पुणे

SPPU : ‘अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षणा’त सहभागी व्हा

संलग्न महाविद्यालयांनी २५ डिसेंबरपर्यंत पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक

- मीनाक्षी गुरव

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालये आणि परिसंस्थांना केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे होणाऱ्या अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षणात (एआयएसएचई) सहभागी होणे बंधनकारक राहणार आहे. त्यासाठी सर्व महाविद्यालये आणि परिसंस्थांनी ‘एआयएसएचई’ पोर्टलवर नाव नोंदणी करणे आणि आवश्यक ती माहिती भरणे गरजेचे आहे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे देशातील उच्च शिक्षणाबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दरवर्षी शिक्षण संस्थांची सांख्यिकी माहिती मागविण्यात येते. त्यानुसार २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाची सांख्यिकी माहिती अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षणातंर्गत मागविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या पुणे, नगर आणि नाशिक जिल्ह्यातील आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालये, परिसंस्थांकडून अखिल भारतीय उच्चतर शिक्षण सर्वेक्षणाच्या पोर्टलद्वारे माहिती मागविण्यात आली आहे.

या ‘एआयएसएचई’ पोर्टलवर नोंदणी करून माहिती भरणे हे विद्यापीठांशी संलग्न सर्व महाविद्यालयांना आणि परिसंस्थांना बंधनकारक आहे. या पोर्टलवर नोंदणी न केल्यास भविष्यात होणाऱ्या नुकसानीस संबंधित महाविद्यालयांचे प्राचार्य, परिसंसंस्थेचे संचालक आणि नोडल अधिकारी हे जबाबदार असतील, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. तसेच अद्याप नोंदणी न केलेल्या महाविद्यालयांनी आतापर्यंत नोंदणी का केली नाही, याचा खुलासा उच्च शिक्षण संचालकांकडे त्वरित सादर करावा आणि त्वरित नोंदणी करावी, अशी सूचनाही विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे.

‘‘नव्याने मान्यता मिळालेल्या महाविद्यालयांनी संबंधित पोर्टलवर दिलेल्या सूचनेप्रमाणे नोंदणी करावी. विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांनी व परिसंस्थांनी २५ डिसेंबरपर्यंत पूर्ण माहिती भरणे बंधनकारक असून लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी. यासंदर्भात काही अडचणी असल्यास संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठातील अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षांशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे सहायक कुलसचिव श्रीकांत गायकवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT