Murlidhar-Mohol 
पुणे

प्लाझ्मादान चळवळीत सहभागी व्हा - महापौर मोहोळ

नीलेश बोरुडे

पुणे - कोरोनाबाधित रुग्णांचा शहरातील मृत्यूदर २. ४० टक्के इतका असून हे प्रमाण अजून खाली आणायचे. त्यासाठी शहरामधील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींनी प्लाझ्मा दान करण्यासाठी मोठ्या संख्येने पुढे यावे, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले. प्लाझ्मादान चळवळीला चालना देण्यासाठी महापौर मोहोळ यांनी स्वतः प्लाझ्मा दानसाठी रक्ताचे नमुने दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे महापालिकेच्या कोरोनामुक्त झालेल्या २१० व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी पात्र असून यात पहिला नमुना महापौर मोहोळ यांनी दिला. त्यावेळी ते बोलत होते. विभागीय आयुक्त सौरभ राव, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, नगरसेवक आदित्य माळवे, अविनाश बागवे, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हकारे, डॉ. नलिनी काहगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख, डॉ. शंकर मुगावे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. नलिनी काडगी, ससून रक्तपेढी विभागप्रमुख यांनी प्लाझ्मा दानाविषयी माहिती दिली. त्या समवेत डॉ. शंकर मुगावे, समाजसेवा अधीक्षक तथा प्लाझ्मा समन्वयक ससून हे उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथ्था यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी डॉ. रामचंद्र हकारे यांनी आभार मानले. सुरेश परदेशी यांनी सूत्रसंचालन केले.

आतापर्यंत ७५० कोरोनामुक्त व्यक्ती प्लाझ्मादान करण्याकरिता पुढे आल्या आहेत. शहरात ८० हजारांपेक्षा जास्त कोरोनामुक्त असून प्लाझ्मादान करण्यासाठी जास्तीत जास्त जणांनी पुढे यायला हवे. प्लाझ्मादान ही संकल्पना व्यापक करण्यात आपण लवकरच विशेष मोहीम राबवत आहोत.
- मुरलीधर मोहोळ, महापौर

पुणे महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी हे कोरोनाविरुद्ध आजपर्यंत लढत आहेत. कोरोनाच्या या लढाईमध्ये प्लाझ्मादान हे एक सकारात्मक पाऊल आहे. आतापर्यंत तुम्ही कोरोना योद्धा म्हणून काम केले. यापुढे प्लाझ्मा योद्धा म्हणून काम करा.
- सौरव राव, विभागीय आयुक्त

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! पहिल्या पतीला सोडून २८ वर्षीय विवाहिता ४४ वर्षांच्या दुसऱ्यासोबत राहिली, त्याने दारुच्या नशेत केला तीन वर्षांच्या चिमुकल्याचा खून, नातेवाईकांच्या संशयानंतर उलगडली कहाणी

Silent Call Scam Alert : फोन वाजतो, पण आवाजच नाही? सावध राहा, तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं!

Bandu Andekar Arrest : जमिनीवर बेकायदा ताबा घेऊन ५.४० कोटींची खंडणी; आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकर अटकेत!

Video Viral: बेडवर झोपलेल्या रुग्णाला डॉक्टरने केली बेदम मारहाण; घटनेचं कारण आलं समोर

शेतकऱ्यांना आता कर्जासाठी घरबसल्या करता येणार अर्ज! ‘या’ पोर्टलवर अर्ज केल्यावर 2 दिवसांत बॅंकांकडून मिळेल पीककर्ज, सोलापुरात शासनाचा पायलट प्रोजेक्ट

SCROLL FOR NEXT