Corona-Danger 
पुणे

परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची पुणे विमानतळावरही तपासणी

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी मुंबईपाठोपाठ पुणे आणि नागपूर येथील विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या बुधवारी वाढली. याबाबतच्या तयारीचा आढावा राज्याचे मुख्य सचिव अजेय मेहता यांनी घेतला. 

तसेच, सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांशी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

कोरोना प्रतिबंध व नियंत्रणाबाबत प्रत्येक जिल्हानिहाय आढावा घेऊन मेहता यांनी कोरोनाची धास्ती न घेता, आवश्‍यक ती खबरदारी घ्यायला हवी, हे स्पष्ट केले. या वेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास यांनी मार्गदर्शन केले. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत ५८६ विमानांमधील ६९ हजार ५०२ प्रवाशांची तपासणी केली आहे. 

कोरोनाचा उद्रेक झालेल्या देशांमधून प्रवास करून राज्यात आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून ४७४ प्रवासी आले आहेत. ताप, सर्दी, खोकला अशी १८ जानेवारीपासून लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत १८७ जणांना दाखल केले आहे. त्यापैकी १७४ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) दिला, इतर १३ जणांचे अहवाल शुक्रवारपर्यंत (ता. ६) मिळतील. आजवर भरती झालेल्या १८७ प्रवाशांपैकी १७० जणांना रुग्णालयातून घरी सोडले आहे.

बाधित भागातून राज्यात आलेल्या ३७३ प्रवाशांपैकी २९५ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे. सोलापूर आणि लोणावळा येथे कोरोना रुग्ण आढळल्याच्या अफवा पसरल्या असून त्यावर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

COMMONWEALTH GAMES 2026 : भारताच्या खात्यात आणखी एक पदक! ऋषिकांत सिंगने राष्ट्रकुल विक्रम मोडला, रौप्यपदक जिंकले

Video : स्टंट करताना हात सुटला अन्... कॉमनवेल्थ गेम्समध्ये थरारक अपघात! 19 वर्षीय जिम्नास्टला स्ट्रेचरवरून रुग्णालयात हलवलं

IND vs ZIM 3rd T20I: भारतीय संघाने टॉस जिंकला; दोन बदलांसह मैदानावर उतरला, वाचा कोणाला मिळालीय Playing XI मध्ये जागा

Rupali Dhamdhere PhD : तळेगाव ढमढेरेच्या रूपाली ढमढेरे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी जाहीर

सलग दोन सुपरहिट हॉरर पट अन् पहिलं सिनेमॅटिक युनिव्हर्स; दिग्दर्शक प्रीतम पाटील यांची बॉक्स ऑफिसवर हवा!

SCROLL FOR NEXT