Patient dies due to lack of ambulance at Primary Health Center at Bhigwan 
पुणे

रुग्नवाहिकेअभावी रुग्नाचा मृत्यू; भिगवण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील स्थिती

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : कोरोनाच्या दहशतीमुळे रुग्नांसाठी रुग्नवाहिकाच उपलब्ध होत नसल्याची वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अत्यवस्थ रुग्न व त्याचे नातेवाईक रुग्नवाहिकेसाठी विविध पातळ्यावर सुमारे चार तास प्रयत्न करत होते शेवटी चार तासांनी रुग्नवाहिका उपलब्ध झाली परंतु तोपर्यंत खुप उशिर झाला होता. रुग्नवाहिकेतून रुग्न इंदापुर येथे उपचारासाठी पोहेचेपर्यंत रुग्नाची स्थिती गंभीर होऊन त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रुग्नवाहिकेअभावी वेळेत रुग्नालयांमध्ये न पोहता आल्यामुळे तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथील काशीनाथ शिवराम परदेशी(वय. ७२) यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी तक्रारवाडी येथील काशीनाथ परदेशी यांची तब्बेत अचानक बिघडल्यामुळे त्यांना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये तपासणीसाठी आणण्यात आले. रुग्नाची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगुन येथील वैदयकिय अधिकाऱ्यांनी रुग्नास इंदापुर येथील उपजिल्हा रुग्नालयांमध्ये नेण्याचा सल्ला दिला. अरोग्य विभागाची रुग्नवाहिका उपलब्ध नव्हती. नातेवाईकांनी अधिकारी व पदाधिकाऱी यांना विनवणी करुन रुग्नवाहिका उपलब्ध करुन देण्याची विनंती केली परंतु उपयोग झाला नाही. शेवटी जिल्हा परिषद हनुमंत बंडगर यांनी स्वतः प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेत इंदापुरच्या तहसिलदार यांचेशी संपर्क साधुन रुग्नवाहिका उपलब्ध करुन देण्याची विनंती केली. अखेर चार तासांनी रुग्नवाहिका उपलब्ध झाली व रुग्नास इंदापुर येथील उपजिल्हा रुग्नालयांमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु तोपर्यंत खुप उशिर झाला होता व तेथे पोहचल्यानंतर काही वेळातच रुग्नाचे निधन झाले. रुग्न वेळेत पोहचला असता तर जीव वाचला असता असे सांगुन रुग्नवाहिका उपलब्ध न झाल्यानेच रुग्नाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांकडुन होत आहे.

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असाइनमेंट बेस घ्या; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?
    
याबाबत जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर म्हणाले, रुग्नवाहिकेअभावी रुग्नांचा जीव जातो आहे ही अत्यंत दुदैवी बाब आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. तसेच कोरोनाशिवाय इतर रुग्नांनाही योग्य उपचार देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.सध्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका अतिरिक्त रुग्नवाहिकेची व्यवस्था करावी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT