corona logo 
पुणे

भीतीमुळे दवाखान्यात जाणे टाळले; कोरोनाने मृत्यूच्या दारात पोहचवले  

दत्ता जाधव

माळशिरस (पुणे) : भीतीमुळे दवाखान्यात जाणे टाळलेल्या पुरंदर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर या रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे टेकवडी ग्रामस्थांसह परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
टेकवडी येथे दीड महिन्यापूर्वी एक कोरोना रुग्ण सापडल्यानंतर तो बरा झाल्याने गाव कोरोनामुक्त झाले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला होता. मात्र, रविवारी येथील एका वस्तीवरील ज्येष्ठाचा मृत्यू होऊन त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आला. त्यामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबियांसह शेजारील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना उपचारासाठी दाखल करणारेही अडचणीच सापडले आहेत. 

दरम्यान, मृत्यू झालेल्या या ज्येष्ठ व्यक्तीला मागील तीन दिवसांपासून त्रास होत होता. मात्र, त्यांनी भीतीपोटी दवाखान्यात जाणे टाळले. रविवारी त्यांना जास्त त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना सासवड येथे उपचारासाठी नेले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यातील लक्षणामुळे प्रशासनाने त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. आजारपणाची भीती न बाळगता काळजी घेऊन त्वरित उपचारासाठी डॉक्‍टराकडे जाऊन वेळीच उपचार घ्यावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: लोकलमधून जीवघेणा प्रवास! दिवा-मुंब्रा वळणावर ट्रेन येताच महिला खाली पडली, धडकी भरवणारा VIDEO VIRAL

Gold Investment: आज 50 हजारांचं सोनं घेतलं तर 10 वर्षांनी किती लाखांचं होईल? जाणून घ्या गणित

खंजिरीचे बोल! राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कथा आता मोठ्या पडद्यावर; 'हा' अभिनेता साकारतोय मुख्य भूमिका, तुम्ही ओळखलंत?

Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Marathi News Live Updates : एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT