Patients are facing problems due to lack of facilities at Covid Care Centre In the Late ramchandra bankar school 
पुणे

पुण्यातील 'या' कोव्हिड केअर सेंटरमध्ये सुविधांचा अभाव; रुग्णांचे होतायत हाल!

संदीप जगदाळे

हडपसर (पुणे) : रामबाबू सिंग हे तीन दिवसांपासून हडपसर येथील कै. रामचंद्र बनकर शाळेतील कोव्हिड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल आहेत. त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत आहे. त्यांची ऑक्सिजन लेवल केवळ ९० इतकी कमी असल्याने त्यांना ऑक्सिजनची आवश्यक्ता आहे. मात्र या सेंटरमध्ये ऑक्सिजनचे दोन सिलेंडर आहेत, पण त्यांचे मास्क नाहीत. त्यामुळे त्यांना ऑक्सिजन देता येत नसल्याने त्यांना खूप त्रास होत आहे. पुण्यात एका शास्त्रज्ञाचा व्हेंटिलेटर बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना महापालिकेच्या आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार अजूनही सुरूच आहे.

श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत असल्याने रामबाबू यांनी शुक्रवारी (ता.१७) रात्री डॉक्टरांना अनेकदा फोन केले, मात्र फोन घेतला जात नाही, किंवा राँग नंबर असल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर शुक्रवारी रात्री अकरा वाजता त्यांनी नगरसेवक योगेश ससाणे याबाबतची माहिती दिली. तसेच आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत व्हिडीओ काढून तो ससाणे यांना शेअर केला. 
 
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ससाणे यांनी तत्काळ आरोग्य प्रमुख डॉ. चंद्रशेखर हंकारे यांना अनेकदा फोन केले, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर मेसेज केला. मेसेज पाहून डॉ. हंकारे यांनी आवश्यकती मदत केली जाईल, असे अश्वासन दिले. त्यानंतरही रूग्णाला कोणतेच उपचार न मिळाल्याने ससाणे रात्री अकरा वाजता सीसीसी सेंटरमध्ये गेले, तेव्हा डॉक्टरांनी रूग्णाला गोळ्या दिल्या. मात्र शनिवारी (ता.१८) दुपारी २ वाजल्या तरी रामबाबू यांना ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे या रूग्णाचा जीव टांगणीला लागला आहे. 

याबाबत ससाणे म्हणाले, सहाय्यक महापालिका आयुक्त कडलख हे उशीरा दुपारी १ वाजता सेंटरवर येतात. केवळ मिटींग घेतात व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतात. त्याचा व्हिडीओ काढतात आणि विनाकारण वेळ घालवतात. डॉक्टरांनी सकाळी १० वाजता सेंटरला येणे अपेक्षीत आहे. मात्र ते उशीरा येतात. पेशंटकडे दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य प्रमुख डॉ. हंकारे यांच्याशी अनेकदा संपर्क केला, मात्र त्यांनी फोन स्विकारला नाही. त्यामुळे डॉ. हंकारे आणि सहाय्यक महापालिका आयुक्त वैभव कडलख यांची हकालपट्टी करण्याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव मांडणार आहे.

Video : पुण्यात व्हेंटिलेटरचा तुटवडा; 20 जणांची मृत्यूशी झुंज

याबाबत परिंमंडळ विभागीय अधिकारी डॉ. दिनेश भेंडे म्हणाले, बनकर शाळेत नव्यानेच सीसीसी सेंटर सुरू केले आहे. तेथे बेडची आणि व्हेंटीलेटरची कमतरता आहे. रामबाबू सिंग यांना आम्ही अन्य रुग्णालयात हलविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र शहरात कोठेही बेड शिल्लक नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT