ram.jpg 
पुणे

पुण्यातील कोरोना रुग्णांबाबत जिल्हाधिकारी यांचा नवा आदेश काय तो पाहा...

सकाळवृत्तसेवा

पुणे : खासगी रुग्णालयात सौम्य लक्षणे असलेल्या कोरोना बाधित रुग्‍णांचे समुपदेशन करुन त्‍यांना घरी पाठविण्‍यात यावे. असे रुग्‍ण घरी जाण्‍यास नकार देत असतील तर त्‍यांची यादी महापालिका प्रशासनाकडे पाठविण्‍यात यावी, अशा सूचना जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिल्या आहेत.

शहर आणि जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. तसेच, गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांना बेड्स मिळण्यास अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे.

खासगी रुग्णालयांधील कोरोना बाधित रुग्णांची माहिती घेण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर तपासणी पथक स्‍थापन करण्‍यात आले आहे. या पथकामार्फत तपासणी करण्‍यात येणार आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेले किंवा सौम्‍य लक्षणे असलेले रुग्‍ण खासगी रुग्णालयात आढळून आल्यास संबंधित रुग्‍णालयाच्‍या प्रशासनावर साथरोग प्रतिबंधक कायदा तसेच आपत्ती व्‍यवस्‍थापन कायद्यानुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असा इशारा जिल्‍हाधिकारी राम यांनी दिला आहे

आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 13 मार्चपासून लागू करुन अधिसूचना जारी केली आहे.

Editied by : sagar shelar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

चाकूने गळा चिरून महिलेची हत्या; अहिल्यानगर जिल्हा हादरला, नवऱ्याचे शेजारच्यांना फाेन, दरवाजा उघडला अन् धक्काच बसला..

'नगर तालुक्यातील कांदा व्यापाऱ्याची ८२ लाखांची फसवणूक'; अनेक दिवस कांदा खरेदी-विक्रीचा व्यवहार झाला अन्..

दुर्दैवी घटना! 'बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू'; संगमनेर तालुक्यातील घटना, आईचा काळीज पिळवटणारा आक्राेश, अंगणात खेळत हाेता अन्..

SCROLL FOR NEXT