Pay attention to the diet during the corona period 
पुणे

कोरोना काळात द्या आहाराकडे लक्ष!

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोना काळात पौष्टिक आहाराच्या कमतरतेमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. निरोगी आयुष्यासाठी आहारात पौष्टिक घटक आणि आवश्‍यक जीवनसत्त्वांचा समावेश करणं गरजेचं आहे. मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासाठी अशी घ्या काळजी. 

- मानसिक अनारोग्य म्हणजे काय? 
मनाची मनोवृत्ती, चिंतेची पातळी, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर झालेले दुष्परिणाम म्हणजे मानसिक अनारोग्य. यामुळे अस्थिर मनःस्थिती, नैराश्‍य, चिंता, झोप न लागणे, चिडचिडेपणा, अस्वस्थता जाणवते. याचा परिणाम रोजच्या जगण्यावरही होतो. 

- आहाराचा मानसिकतेशी संबंध कसा? 
अपोलो डायग्नोस्टिक्‍सच्या सर्वेक्षणानुसार, कोरोना काळात बहुतांश तरुणांमध्ये मानसिक आजाराची समस्या समोर आली. पौष्टिक आहाराचा अभाव हे यामागील मुख्य कारण असल्याचे डॉक्‍टर सांगतात. चांगला, सकस व समतोल आहार घेतला तर बरेचसे आजार टाळता येतात. कारण यामुळे आपल्या मनाची मनोवृत्ती स्थिर राहते. 

-संतुलित आहार कसा असावा? 
व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, आणि लोह यांचा आहारात समावेश आवश्‍यक. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार रोजच्या आहारात दोन कप फळे, अडीचकप पालेभाज्या, 180 ग्रॅम दाळी, 160 ग्रॅम मांसाहार, अंडी यांचा समावेश असावा. तसेच, जास्त किंवा कमी मसालेदार आणि जास्त शिजलेले अन्न टाळावे. रोज 8 ते 10 कप पाणी प्यावे. 

- वेळीच डॉक्‍टरांचा सल्ला घ्या 
कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांनी संतुलित आहार आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अस्वस्थ वाटत असेल, चिडचिड होत असेल तर डॉक्‍टरांचा सल्ला घ्या. संगणकावर सातत्याने काम, बाहेर न पडणे, अनावश्‍यक भीती यामुळे मानसिक समस्या जाणवू शकते त्याकडे विशेष लक्ष द्या 

- मानसिक समस्यांसंबंधीच्या अंधश्रद्धा पाळू नका 
भारतीय मनोरुग्ण संस्थेच्या सर्वेक्षणानूसार देशात अजूनही मानसिक समस्येला निषिद्ध (टॅबू) म्हणून पाहिले जाते. मध्यमवर्गिय आणि उच्च मध्यम वर्गियांमध्ये मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्याविषयी अंधश्रद्धा आहे. लॉकडाउनच्या काळात 85 टक्के लोकांमध्ये थकव्याची समस्या, तर 40 टक्के लोकांना सर्वसाधारण मानसिक समस्या जाणवल्याचे या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 

- यांची कमतरता करते मानसिक आरोग्यावर परिणाम 
1) झिंक ः मूड आणि चिंतेच्या पातळीवर परिणाम. भूक कमी आणि व्यक्तीला अशक्तपणा जाणवतो. 
2) ओमेगा- फॅटी अँसिड ः अस्थिर मनःस्थिती, नैराश्‍य, चिंता वाढते. 
3) व्हिटॅमिन डी ः नैराश्‍य, चिंता आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो 
4) व्हिटॅमिन बी 12 ः नैराश्‍यावर मात करता येऊ शकते. 
6) मॅग्नेशिअम ः चिंता आणि भीती, अस्वस्थता, झोप न लागणे आणि चिडचिडेपणा. 
7) सेलेनियम ः मूड सुधारण्यास मदत. 


''आरोग्य तपासणीत 25 -55 वयोगटातील व्यक्तींचे नमुने घेण्यात आले होते. त्यातून असे निदर्शनास आले की, गेल्या 12 महिन्यांत जवळजवळ 20 टक्के लोकांना पोषण कमतरता आहे. यामागील मानसिक आरोग्य हे मुख्य कारण आहे.''
- डॉ. संजय इंगळे, पॅथॉलॉजिस्ट. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Nandgaon Municipal Election : ४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीला कंटाळले; नांदगावकर निवडणुकीच्या प्रतीक्षेत

Pachod News : संजय कोहकडे मृत्यू प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल होणार

Latest Maharashtra News Updates : बावधन पोलिस चौकीसमोरची परिस्थिती

SCROLL FOR NEXT