पुणे

Loksabha 2019 : पिंपरी शहरातील गुंडांची निघणार धिंड

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहर पोलिसांनी गुंडांची धरपकड सुरू केली आहे. विशेषतः गंभीर स्वरुपाचे गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या टोळ्यांमधील गुंडांची त्यांच्या भागातून धिंड काढण्याची तयारीही पोलिसांनी केली आहे.

पोलिसांच्या खंडणी आणि दरोडाविरोधी पथकाच्या रेकॉर्डनुसार पिंपरी-चिंचवड आयुक्‍तालयाच्या हद्दीत गुन्हेगारांच्या १४ टोळ्या आणि त्यांचे १९४ सदस्य आहेत. त्यांच्यासह गल्लीबोळात दहशत माजवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. अशा टोळक्‍यांकडूनच शहरात वाहनांची तोडफोड केली जात असल्याचे पोलिसांचे निरीक्षण आहे. काही गुंड निवडणुकीत सक्रिय असतात. प्रचारात अडथळे आणतात. उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना धमकावणे, हाणामारी करून दहशत निर्माण करणे, मतदानावर विपरित परिणाम होईल, असे कृत्य गुंड करतात. 

प्रतिबंधात्मक कारवाई
गुंड टोळ्यांच्या यादीत काही राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचीही नावे आहेत. त्यांचीही यादी पोलिसांकडे आहे. त्यांना काही दिवसांत तडीपार केले जाणार आहे. काहींना तडीपारीची नोटीस बजावली आहे. काहींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यांना एक वर्षासाठी तुरुंगात रवानगी केली जाणार आहे.

रेकॉर्डवरील टोळ्या
देहूरोडची महाकाली टोळी, भरणे टोळी, प्रकाश चव्हाण टोळी, वाघेरे टोळी, श्‍याम दाभाडे टोळी, टकले टोळी, तांगडे टोळी, आळंदीतील राठोड टोळी, चाकणची दाभाडे टोळी, अलकुंडे टोळी या पूर्वी नावाजलेल्या गुन्हेगारी टोळ्या आहेत. सध्या या टोळ्यांच्या कारवाया थंडावल्या आहेत. मात्र, नव्याने उदयास आलेल्यांमध्ये सोन्या काळभोर टोळी, चिंचवडची मामा टोळी, रावण साम्राज्य टोळी, घोलप टोळी, वाकडची शेख टोळी आणि चिखलीतील आक्‍या बॉण्ड टोळी आदींचा समावेश आहे. त्यांतील गुंडांची यादी पोलिसांकडे तयार आहे. त्यांच्यावर जरब बसावी व नागरिकांना त्यांच्याविषयी वाटणारी भीती कमी व्हावी, यासाठी हाताला दोरखंड बांधून किंवा बेड्या 
घालून संपूर्ण परिसरातून गुन्हेगारांची धिंड काढण्याची तयारी पोलिसांनी केली आहे.

सोशल मीडियावर सक्रिय
सोशल मीडियावर प्रतिस्पर्धी टोळ्यांना उघडउघड धमकी देणाऱ्या पोस्ट व त्याला लाईक किंवा कॉमेंट करणाऱ्यांवर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी कारवाईचा बडगा उगारला होता. त्यामुळे टोळ्यांनी सोशल मीडियावरून गाशा गुंडाळला. मात्र, निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काही टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसत आहे. याबाबत खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक सुधीर अस्पत म्हणाले, ‘‘गुन्हेगारी टोळ्यांच्या सदस्यांवर निवडणुकीच्या काळात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. गरज पडल्यास काही टोळ्यांमधील सदस्यांना तडीपार किंवा एमपीडीएची कारवाई केली जाणार आहे.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT