shenga.JPG 
पुणे

शेंगदाण्याच्या दरात 'एवढी' घट झालीये कारण...

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड (पुणे) : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाउन सुरू झाल्याने तेथून येणारा ग्राहक वर्ग कमी झाला आहे. तसेच विविध भागांत भुईमूग पीक निघण्यास आताच सुरुवात झाली आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे शेंगदाणे क्विंटलमागे 300 रुपयांनी स्वस्त झाले आहेत. येत्या काळात ते अजूनही स्वस्त होण्याची शक्‍यता मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी वर्तविली. आता किरकोळ बाजारात दर्जानुसार शेंगदाणे 90 ते 120 रुपये किलोप्रमाणे मिळत आहे. 

अधिक महिन्यामुळे नवरात्रोत्सव एक महिना पुढे गेला आहे. या महिन्यात सणवार नसतात. त्याचा काहीसा परिणाम बाजारात जाणवू लागला आहे. हॉटेल, आयटी कंपन्या आणि खाणावळी अजूनही पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत. ते सुरू झाल्यानंतर शेंगदाण्यांना मागणी वाढेल, असे मार्केट यार्डातील व्यापारी अशोक लोढा यांनी सांगितले. 

सध्या बाजारात कर्नाटक, आंध्रप्रदेश, गुजरातसह विदर्भातून शेंगदाण्यांची आवक सुरू आहे. दररोज बाजार 60-80 टन माल येत आहे. सध्या बाजारात नवीन हंगामातील शेंगदाण्यांची आवक होत आहे. ती हळूहळू वाढत जाणार असल्याचेही लोढा यांनी सांगितले. 

घाऊक बाजारातील भाव (प्रती क्विंटल) 
कर्नाटक घुंगरू : 8000 ते 8500 
जाडा शेंगदाणा : 7800 ते 8200 
स्पॅनिश शेंगदाणा : 9000 ते 9500 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ! हैदराबादमध्ये पेट्रोल 116 रुपयांवर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल-CNG किती?

Kankavli Assault Case: गणपतीला माहेरी आली, जमिनीच्या वादातून आई-भावंडांसह पाच जणांकडून बेदम मारहाण

सासूसोबत जिनिलीयाचं खास बॉण्डिंग, घरच्या गणपतीची लगबग; देशमुख कुटुंबाचे फोटो व्हायरल

Latest Marathi News Update : धनुष्यबाण राहणार की जाणार? शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सुनावणी

IND vs AFG, T20I: मालिका जिंकण्यासाठी भारत सज्ज! सॅमसनच्या कामगिरीकडे लक्ष, पाचव्या गोलंदाजाची चिंता कायम; कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT