The water pipeline repairing are start Sakal
पुणे

भवानी पेठेत चेंबरमुळे जाऊ शकतो पादचारी, वाहनचालकांचा जीव

पावसाळी लाईन व चेंबरच्या दुरावस्थामुळे पादचारी व वाहनचालकांना अपघाताचा धोका

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट: भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग 19 येथे अनेक रस्त्यातील पावसाळी लाईन व चेंबर रस्त्याच्या उंचीच्या खाली आणि वर झाल्याने जड वाहने धडकून-आदळून अनेक पावसाळी लाईन व चेंबर तुटले आहेत. त्यामुळे दुचाकी आणि पादचाऱ्यांना अपघाताचा धोका वाढला आहे. महापालिका (PMC) प्रशासनाने रस्त्यातील चेंबर आणि खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक खासदार वसंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष नरेश इन्द्रसेन जाधव यांनी केली आहे.

पालिका प्रशासनाकडून रस्त्याची डागडुजी करताना डांबर टाकले जाते. मात्र, समतल रस्ता करण्याकडे प्रामुख्याने दुर्लक्ष केले जात आहे. यावेळी गुरुनानक नगर, जुना मोटार स्टॅन्ड, सेव्हन लव्हज ते टिंबर मार्केट चौकाकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर चढउतार पावसाळी लाईन व चेंबर खालीवर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (Pune News)

रस्ते (Roads) विभागाने चेंबर आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच चेंबरच्या जाळ्या दर्जेदार बसवाव्यात, पावसाळी वाहन्यांची दुरुस्ती करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी पावसाळी लाईन देखील कचऱ्याने तुडुंब भरले आहे. जाळ्या नसल्याने रात्री (Night) अपरात्री पादचारी व वाहनचालकांचे छोटे मोठे अपघात दररोज घडत आहे.

वारंवार तक्रार करूनही याकडे क्षेत्रीय कार्यालयाकडून दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे सर्वच नागरिक जेरीस आले आहेत. प्रशासनाच्या आरोग्याच्या बाबतीत तातडीने उपाययोजना करून रस्ते, चेंबर आणि कचऱ्याची कामे तातडीने करावीत, असा सल्ला येथील सूज्ञ नागरिकांनी दिला आहे.

यासंबंधित क्षेत्रीय कार्यालयाचे मनपा सहा.आयुक्त सोमनाथ बनकर म्हणाले की, मुख्य रस्त्यांच्या कामाचाविषयी हा मुख्य खात्याकडे आहे. प्रभागातील अंतर्गत कामाची माहिती घेऊन पाहणी करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT