Penalty collection by contract worker in the absence of traffic police in Pune 
पुणे

Video : काय सांगता ! ट्रॅफिक पोलिसांऐवजी गाडी उचलणाऱ्यानेच केली दंडवसुली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नो पार्कींगमध्ये असणारी वाहने उचलणाऱ्या अत्याधुनिक टोईंग व्हॅनवरील कंत्राटी कामगाराकडून दंडाची रक्कम भरण्यासाठीचे ई-चलन मशीन असल्याचे व त्याच्याकडून नागरीकांकडून दंड वसुल केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ वाहतुक विभागातील वाहतुक पोलिस कर्मचाऱ्याच्या अनुपस्थितीमध्ये हा प्रकार घडला आहे. 

FlashBack 2019 : 'या' दहा नावांनी ढवळून काढलं महाराष्ट्राचं राजकारण

नो पार्कींगमध्ये असणारी वाहने अत्याधुनिक टोईंग व्हॅनद्वारे उचलून ती पोलिस ठाण्याच्या परिसरामध्ये आणून लावली जातात. तेथे किंवा गाडी उचललेल्या ठिकाणीच संबंधीत टोईंग व्हॅनवर असलेल्या वाहतुक पोलिसांकडून ई-चलन मशीनद्वारे वाहनचालकाकडून दंडाची रक्कम घेऊन त्याची गाडी सोडली जाते. मात्र भारती विद्यापीठ वाहतुक विभागामध्ये सोमवारी दुपारी वाहतुक पोलिसाच्या अनुपस्थितीमध्ये संबंधीत टोईंग व्हॅनवर काम करणारा कंत्रांटी कामगारकडे दंड भरण्यासाठीची ई-चालान मशीन हातात घेऊन वाहनचालकांकडून दंड वसुल करत असल्याचे स्थानिक रहिवासी प्रभाकर सुर्यवंशी यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याबाबत कंत्राटी कामगारास विचारणा केली, त्यावेळी त्यांने सुर्यवंशी यांच्याशी वाद घालून त्यांना "या प्रकाराविषयी आम्हाला विचारु नका, साहेबांना सांगा जाऊन' अशा शब्दात उत्तरे दिली. तसेच या घटनेचा सुर्यवंशी व्हिडीओ करीत असताना त्यांना अडथळा आणला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

"भारती विद्यापीठ वाहतुक विभागातील पोलिस कर्मचारी जेवायला गेलेला असताना हा प्रकार घडला आहे. संबंधीत कंत्राटी कामगाराकडे ई-चलन मशीन कशी आली, याची चौकशी करुन संबंधीतांवर कडक कारवाई केली जाईल.'' डॉ. संजय शिंदे, अतिरीक्त पोलिस आयुक्‍त (वाहतुक विभाग) 


"वाहतुक पोलिसांनी ई-चलन मशीनद्वारे दंडाची रक्कम स्विकारायला पाहीजे. मात्र कंत्राटी कामगाराच्या हातामध्ये ई-चलन सारख्या मशीन दिल्या जात असून कामगारच वाहनचालकांकडून दंड वसुली करीत आहेत. हा प्रकार बेकायदेशीर आहे. '' प्रभाकर सुर्यवंशी. सजग नागरीक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT