malshej. 
पुणे

पुणेकरांनो, फिरायला जाण्याचा प्लॅन करण्यापूर्वी हे वाचा... 

दत्ता म्हसकर

जुन्नर : पावसाळ्यात पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड व शिरूर या चार तालुक्यातील वनक्षेत्रातील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी बंद राहणार आहेत. कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन या संसर्गजन्य आजाराचा प्रसार रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जुन्नर वनविभागाचे उपवन संरक्षक जयरामे गौडा यांनी सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना या आदेशाचे पालन करण्यासंबंधी कळविले आहे. त्यानुसार या पावसाळ्यात नाणेघाट, घाटघर, माळशेज घाट, अवसरी घाट उद्यान, किल्ले शिवनेरी, चावंड, हडसर, जीवधन, नारायणगड, ढाकोबा, दुर्गवाडी, भीमाशंकर, आंबोली, खिरेश्वर, कुंडेश्वर महादेव आदी सर्व पर्यटनस्थळावर सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

पर्यटनस्थळी कोरोना बाधित व्यक्ती आल्यास तिच्या संपर्कातून अन्य पर्यटकांना त्रास होऊ नये, यासाठी ही बंदी असून या बंदीचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, समूह यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे.

पावसाळ्यात पर्यटनासाठी आल्यानंतर मद्यपान करून हुल्लडबाजी केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. तसेच, गडावरून पाय घसरून पडल्याने मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या आदेशाचे गावाच्या वनहक्क समितीच्या सहकार्याने वन कर्मचाऱ्यांनी पर्यटनस्थळी पर्यटकांचा प्रवेश दिला जाणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. 

रोजगार मुकणार  
घाटघर व आंबोली येथे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांकडून मागील वर्षांपासून उपद्रव शुल्क वसूल केले जात होते. वनविभाग व वनहक्क समितीच्या माध्यमातून स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे आठ ते दहा जणांना रोजगार उपलब्ध होत होता. मात्र, बंदीमुळे त्यास मुकावे लागणार असून, स्थानिक गावकऱ्यांचे व्यवसाय देखील बंद राहून नुकसान होणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi उद्यापासून टीम इंडियाच्या सीनियर संघासाठी पात्र ठरणार; IPL 2026 नंतर कोहली, रोहितसोबत खेळणार...

Kondhwa News : बोपदेव घाट उतारावर सातत्याने अपघात; प्रशासनाने गतिरोधक बसवण्याची नागरिकांची मागणी

farmer relief fund : विमा नसलेल्या बागांना हेक्टरी २२ हजारांची मदत; नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाकडून दिलासा

Electricity Bill Hike: सर्वसामान्यांना मोठा धक्का! वीज दरात वाढ करण्यास मंजुरी; आता प्रति युनिट किती रुपये मोजावे लागणार?

पेट्रोल पंपावर मिळणार दारू! नव्या अबकारी धोरणाला मंजुरी, प्रशासन म्हणते, सहज खरेदी अन् पारदर्शकतेसाठी निर्णय

SCROLL FOR NEXT