CET_Exam 
पुणे

राज्य सरकारने 'सीईटी'ची परीक्षा रद्द करावी; कुणी केली मागणी?

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्य सरकारने सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी केव्हा आणि कशी घ्यावयाची याचा निर्णय जाहीर केलेला नाही.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी 'सीईटी' घेतल्यास अनेक विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनाने यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठीची 'एमएच सीईटी' रद्द करून इयत्ता १२ वीच्या गुणांवर खासगी विद्यापीठ आणि इतर महाविद्यालयांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पेरा संघटनेचे अध्यक्ष आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश कराड आणि उपाध्यक्ष भरत अग्रवाल यांनी केली.

राज्यातील खासगी विद्यापीठांनी एकत्र येत विद्यापीठांच्या कायद्यानुसार पेरा (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या संघटनेची स्थापना केली आहे. डॉ. कराड म्हणाले, "महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या पेरा या संघटनेत १२ खासगी विद्यापीठांचा समावेश झाला आहे. ही संघटना उच्च शिक्षण आणि राज्यातील स्वयं अर्थसाहित विद्यापीठांच्या न्याय व हक्कासाठी कार्य करते. या संघटनेच्या सदस्यांची मागील आठवड्यात बैठक झाली. या बैठकीत राज्य सरकारतर्फे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणार्‍या एमएच सीईटी परीक्षेला होणार्‍या विलंबामुळे चिंता व्यक्त करण्यात आली. 

यंदा नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरू होत नसल्यामुळे पालक आणि विद्यार्थी ही चिंताग्रस्त आहेत. दरम्यान, राज्यात कोरोना महामारीचे संकट वाढत आहे. अशात राज्य शासनाची एमएचटी-सीईटी घेणे विद्यार्थ्यांसाठी धोकादायक होईल. म्हणून सरकारने ही परीक्षा रद्द करावी, अशी मागणी होत आहे. बारावीच्या गुणांवर विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास परवानगी दिल्यास त्याचा लाभ राज्य विद्यापीठांशी संलग्न असणार्‍या महाविद्यालयांसह खासगी विद्यापीठांना ही होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही डॉ. कराड यांनी नमूद केले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kunbi Certificate Update : मनोज जरांगेंच्या उपोषणाआधी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मराठवाड्यात 74 हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; हैदराबाद गॅझेटिअरनुसार किती अर्ज मंजूर?

Meta News: अरे बापरे! रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत Insta-Facebook बंद; Meta चे नवे नियम काय?

अमिताभ बच्चन यांनी वयाच्या 83 व्या वर्षी भात खाणं सोडलं; खरंच वयानुसार Rice बंद करणं फायदेशीर आहे?

Marathi News Live Updates : ठाण्यात क्लस्टर योजनेविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा

Central Railway: मध्य रेल्वेवर १५ दिवस पॉवरब्लॉक, अनेक लोकलवर परिणाम; वेळापत्रकात मोठे बदल

SCROLL FOR NEXT