Period of thousands of PMP passengers Passes need to be extended 
पुणे

पीएमपीच्या पासला मुदतवाढ द्या, हजारो प्रवाशांची मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पीएमपीच्या हजारो प्रवाशांच्या पासची लाखो रुपयांची रक्कम पीएमपीकडे जमा असून त्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचचे दत्तात्रेय फडतरे यांनी प्रशासनाकडे केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

कोरोनामुळे पुणे, पिंपरी -चिंचवड मनपा हददी बाहेरील बससेवा 17 मार्चपासून बंद झाली आहे. 26 मे पासून पिंपरी चिंचवडमध्ये 30 मार्गांवर बससेवा सुरू झाली आहे. हजारो प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे पासचे पैसे अगोदर भरले आहेत. मात्र, लॉकडाउनमुळे त्यांना बससेवेचा वापर करता आलेला नाही. त्यामुळे कामगार, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक अशा प्रकारच्या हजारो पासधारकांचे लाखो रुपये महामंडळाकडे जमा आहेत. त्यांच्या पासेसला मुदतवाढ मिळणे गरजेचे आहे. परंतू, पीएमपी प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.

अय्या खरंच, तुळशीबाग सुरू होत आहे...

 कोरोनामुळे पीएमपला आतापर्यंत 100 कोंटीचा फटका बसला असला तरी हजारो पासधारकांचे लाखो रुपये पीएमपीकडे जमा असताना पासधारकांच्या पासची मुदतवाढ किंवा रिफंड देण्यासबंधी पी.एम.पी प्रशासनाने अजुनपर्यंत काहीही निर्णय घेतला नाही. टप्प्याटप्प्याने बससेवा सुरु होईल त्यानुसार पीएमपी बंद कालावधीत झालेल्या गैरसोयीचा दिलासा देण्यासाठी साठ ते नव्वद दिवसांपर्यंत पासधारकांना पासची मुदतवाढ देण्याची व्यवस्था पीएमपी प्रशासनाने करावी, अशी मागणी मंचतर्फे फडतरे यांनी पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्याकडे केली आहे.

पुणे : कोथरूडवरील विघ्न थोडक्यात टळले; पहाटेपर्यंत चादणी चौकात होते चिंतेचे वातावरण

 ज्या विद्यार्थ्यांचे लॉकडाउन काळातील वापर न केलेले पास असतील, अशा विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला नवीन बोनाफाईड, ओळखपञ काढुन नवीन पास काढण्याची सक्ती करण्यात येवु नये, असे निवेदनात म्हटले आहे.

खेड -शिवापुर टोल नाका परिसरातून धावणाऱया बसेसचा टोल व्यवस्थापकांनी टोल वाढवुन मागितल्यामुळे व पीएमपीने टोल वाढवुन देण्यास नकार दिल्याने टोलनाक्यावर बसेस रोखुन धरण्यात आल्या. परिणामी पीएमपीने या भागातील  लॉकडाउनपुर्वीच काही दिवस बससेवा बंद केली आहे. ती पूर्ववत सुरु करण्याबाबत विचार करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनो, 15 जुनला शाळेचा पहिला दिवस पण...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, १४ जिल्ह्यांत जोरदार बरसणार; ४८ तास धोक्याचे

Latest Marathi News Updates: आयुष कोमकर हत्या प्रकरणी आंदेकर कुटुंबातील आणखी चौघांना अटक

Pune Theatre Festival : नाट्यप्रेमींसाठी तीन दर्जेदार नाटकांची पर्वणी; ‘सकाळ’तर्फे येत्या आठवड्यात नाट्य महोत्सवाचे आयोजन

Gondia News: देवरी एमआयडीसीतील सुफलाम कंपनीत भीषण अपघात; मशीनमध्ये अडकून मजुराचा होरपळून मृत्यू

TET Exam Date : टीईटी परीक्षेची तारीख ठरली, परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क 'या' तारखेपासून भरता येणार

SCROLL FOR NEXT