पुणे

पुणे : माथाडी संघटनेच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्यास अटक

सकाळ वृत्तसेवा

गोखलेनगर : माथाडी संघटनेचा कामगार असल्याचे सांगून ट्रकमधील माल खाली उतरवण्याच्या नावाखाली कंपनीच्या मालकाकडे 40 हजार रुपयांची खंडणी मागणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दरम्यान, चतुःश्रृंगी पोलिसांनी आरोपीस अटक केली. 

विकी दिलीप धोत्रे (रा.वडारवाडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी विजय बाजीराव वाशिवाले (वय 30, रा.नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची "डब्ल्युएनएस पॅकींग ऍन्ड मुव्हींग' नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीतर्फे ग्राहकाच्या विविध प्रकारच्या मालाची ने-आण केली जाते.

फिर्यादी, त्यांचे सहकारी विशाल गंगावणे हे त्यांच्या कंपनीचा ट्रक मगरपट्टा येथून 200 संगणक भरुन तो शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास वडारवाडी येथील स्वस्तीक सोसायटीमध्ये उतरवित होता. त्यावेळी विकी धोत्रे हा तेथे आला. आपण माथाडी कामगार असून आपल्या परवानगीशिवाय माल उतरवू नये, तसेच माल उतरवायचा असल्यास 40 हजार रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय गाडी जागेवरून जावू देणार नाही, अशा शब्दात त्याने ट्रकचालकास धमकी दिली. हा प्रकार गंभीर असल्यामुळे फिर्यादी यांनी तत्काळ चतुःश्रृंगी पोलिसांकडे याबाबत फिर्याद दाखल केली.

पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेऊन धोत्रे यास तत्काळ अटक केली. त्याच्याविरुद्ध शिवीगाळ करुन जबरदस्तीने खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बी.एस.शिंदे करीत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena Symbol Dispute : दोन्ही गटांना नवे नाव, चिन्हे का दिली नाहीत? शिवसेना पक्षाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

India ODI Squad : भारताच्या वनडे संघात Rishabh Pant ला का मिळाली नाही संधी? ही असू शकतात ३ महत्त्वाची कारणं

Latest Marathi News Update : पुण्यात एफडीएची मोठी कारवाई!५६ लाखांचा अन्नसाठी जप्त

Gokul Milk Union : गोकुळमधील अवसायनातील संस्थांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयातील याचिका फेटाळली; ४९२ संस्थांचा मतदानाचा अधिकार कायम

‘देवमाणूस’नंतर किरण गायकवाडची नवी इनिंग; राजकारण अन् गुन्हा… ‘एफआयआर नं. ४६९’मध्ये नेमकं काय पाहायला मिळणार?

SCROLL FOR NEXT