bajar.jpg
bajar.jpg 
पुणे

प्रशासकांवर कारवाई न झाल्यास न्यायालयात याचिका; राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा इशारा

सकाळवृत्तसेवा

मार्केट यार्ड :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक  बी. जे. देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात गैरव्यवहार केले आहेत. आम्ही केलेल्या मागणीनुसार पणनमंत्र्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्यावर कारवाई न झाल्यास आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करून देशमुख यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती न्यायालयापुढे सादर करू. तसेच चौकशी सुरू झाल्यानंतर आम्हाला देखील चौकशीत सहभागी होऊन बाजू मांडण्याची संधी द्यावी. देशमुख यांनी केलेल्या गैरव्यवहाराची माहिती, कागदपत्रे आम्ही चौकशी समितीसमोर सादर करू, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश म्हस्के यांनी सांगितले.

बाजार समितीत प्रशासक देशमुख यांनी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केल्याचा आरोप घुले आणि म्हस्के यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत केला. देशमुख यांनी त्यांच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केले असून त्यांनी मोठ्या प्रमाणावर बेकायदा मालमत्ता उभी केली आहे, असे आरोप त्यांनी पत्रकार परिषदेत केले. राजेंद्र खांदवे, मधुकर घुले याप्रसंगी उपस्थित होते.

देशमुख यांनी केलेल्या गैरव्यवहार प्रकरणाचा पाठपुरावा आम्ही केला. त्यांची चौकशी करून प्रशासकापदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी आम्ही निवेदनाद्वारे केली. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना निवेदनही दिले होते. त्यानंतर पणनमंत्र्यांनी देशमुख यांची चौ जीकशी करण्याचे आदेश पणन संचालकांना आहेत. तसेच त्यांचे निकटवर्तीय, नातेवाईकांच्या नावावर मोठी गुंतवणूक केली आहे. गैरव्यवहारातून त्यांनी जवळपास शंभर ते दीडशे कोटी रुपयांची बेकायदा मालमत्ता जमा केली असल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे.

यापूर्वी शासकीय पदांवर करताना मी कारवाई केली आहे. अशा मंडळीनी माझ्यावर हेतुपुरस्सर, पूर्वग्रदूषित, निराधार केले आहेत. यापूर्वही हेच आरोप केले होते. या सर्व आरोपांचा तपशीलवार पुराव्यासहीत खुलासा शरद पवार, पणन मंत्री, पणन संचालक यांच्याकडे सादर केले आहेत. असे खोटे आरोप करणाऱ्यांवर मी न्यायालयात  अब्रुनुकसानीचा फौजदारी आणि दिवाणी दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. - बी जे. देशमुख, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT